Published On : Tue, Aug 17th, 2021

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गोधनी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र आज राहिले बंद

पावर ब्रेकडाऊन : ८ जलकुंभांचा पाणीपुरवठा झाला आज बाधित, पाणी पुरवठा उद्या (बुधवारी) देखील बाधित राहण्याची शक्यता………

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

नागपूर : नागपूर मनपा आणि OCW च्या गोधनी पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा आज (मंगळवार, ऑगस्ट १७) , सकाळी ८ वाजेपासून खंडित झाल्यामुळे आज जवळपास ८ जलकुंभावरील पाणीपुरवठा बाधित राहिला. वृत्त लिहिस्तोवर उशिरा रात्री पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य युध्द स्तरावर सुरु होते पण जर काम पूर्ण झाले नाही तर उद्या दिनांक १८ ऑगस्ट (बुधवार ) रोजी देखील सकाळचा पाणीपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे.

या अचानक झालेल्या पावर ब्रेकडाऊन मुले आशीनगर, लक्ष्मी नगर, धरमपेठ, हनुमान नगर व नेहरू नगर झोन्समधील ८ जलकुंभांचा.. ह्यात नारा नारी, जरीपटका (आशी नगर झोन), धंतोली (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर जुने, नवे, म्हाळगी नगर (हनुमान नगर झोन), तसेच हुडकेश्वर व नरसाळा गाव.. चा पाणीपुरवठा १७ ऑगस्ट (मंगळवारी) दिवसभर बाधित राहिला आणि उद्या ऑगस्ट १८ (बुधवारी ) देखील बाधित राहण्याची शक्यता आहे (विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास) .

या अचानक झालेल्या पावर ब्रेकडाऊन मुले पाणीपुरवठा बाधित राहणारे ८ जलकुंभ पुढीलप्रमाणे:

नारा जलकुंभ: निर्मल सोसायटी, आराधना कॉलोनी, शंभू नगर, शिवगिरी लेआऊट, नूरी कॉलोनी, तवक्कल सोसायटी, आर्य नगर, ओम नगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवी नगर, प्रीति सोसायटी

नारी/जरीपटका जलकुंभ: भीम चौक, हुडको कॉलोनी, नागार्जुना कॉलोनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, ख़ुशी नगर, LIG कॉलोनी, MIG कॉलोनी, सुगत नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रमाई नगर, दीक्षित नगर, सन्याल नगर, चैतन्य नगर, सहयोग नगर मानव नगर, शेंडे नगर, राजगृह नगर, लहानुजी नगर

लक्ष्मी नगर नवे जलकुंभ: सुरेंद्र नगर, देव नगर, सावरकर नगर, विवेकानंद नगर, विकास नगर, हिंदुस्तान कॉलोनी, प्रगती नगर, गजानन नगर, सहकार्य नगर, समर्थ नगर (पूर्व व पश्चिम), प्रशांत नगर, संपूर्ण अजनी भाग, उरुवेला कॉलोनी, राहुल नगर, नवजीवन कॉलोनी, छत्रपती नगर पावर हाऊसजवळ, कानफाडे नगर, विश्राम नगर, संताजी नगर, नरगुंदकर लेआऊट, LIC कॉलोनी, रामकृष्ण नगर व इतर

धंतोली जलकुंभ: धंतोली, कॉंग्रेस नगर, हम्पयार्ड रोड, तकिया स्लम.

ओंकार नगर १ व २ जलकुंभ: रामटेके नगर, रहाटे नगर टोली, अभय नगर, गजानन नगर, जोगी नगर, पार्वती नगर, भीम नगर, जय भीम नगर, जयवंत नगर, शताब्दी नगर, कुंजीलालपेठ, हावरापेठ, बालाजी नगर, चंद्र नगर, नालंदा नगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट

म्हाळगी नगर जलकुंभ: सन्मार्ग नगर, अन्नपूर्णा नगर, नवे नेहरू नगर स्लम, विघ्नहर्ता नगर, संतोषी नगर, सरस्वती नगर, शिवशक्ती नगर, जानकी नगर, न्यू अमर नगर, विज्ञान नगर, गुरुकुंज नगर, म्हाळगी नगर, गजानन नगर, प्रेरणा नगर, सूर्योदय नगर, महालक्ष्मी नगर, महात्मा गांधी नगर, अष्टविनायक कॉलोनी, राधाकृष्ण नगर, शिवाजी नगर, मां भगवती नगर श्री नगर जलकुंभ: श्री नगर, सुंदरबन, ८५प्लॉट, सुयोग नगर, साकेत नगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे लेआऊट, PMG सोसायटी, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबी नगर, म्हाडा कॉलोनी, ई.

नालंदा नगर जलकुंभ: जय भीम नगर, पार्वती नगर, ज्ञानेश्वर नगर, कैलाश नगर, बालाजी नगर, चंद्र नगर, नाईक नगर, मित्र नगर, गजानन नगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट, नालंदा नगर, बँक कॉलोनी

रेशीमबाग जलकुंभ शटडाऊन १८ ला
नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी रेशीम बाग जलकुंभ येथे १२ तासाचे शटडाऊन १८ ऑगस्ट (बुधवार ) रोजी घेण्याचे ठरविले आहे.

या शटडाऊनमुळे बुधवारी (१८ ऑगस्ट ) पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

रेशीम बाग जलकुंभ: जुनी शुक्रवारी, गणेशनगर, महावीरनगर, गणेशनगर, जुने आणि नवीन नंदनवन , आनंद नगर, शिव नगर, नेहरू नगर, सुदामपुरी, मिरे ले आउट, बंद गाली, सक्करदरा पोलीस स्टेशन चा भाग