Published On : Tue, Jul 16th, 2019

गौतमनगर छावणीत दूषित पाण्यामुळे आजाराची लागण

कामठी :-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 15 येथील गौतम नगर छावणी परिसरात मागील काही महिन्यांपासून दुर्गांधोयुक्त घाण पाण्याचा पुरवठा होत असल्याने या दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांना विविध आजारांची लागण झाल्याने बहुतांश नागरिक उपचारार्थ येथील माहुरे हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ उपचार घेत आहेत.

नियमितपणे कर भरणाऱ्या करदात्यांना कामठी नगर परिषद च्या वतीने योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याने नागरिकांत नगर परिषद प्रशासन विषयी नाराजगीचा सूर वाहत आहे . वाढत्या लोकसंख्येनुसार शहरवासीयांना जास्तीत जास्त दर्जेदार सुविधा पुरविण्यासाठी सरकारकडून विशेष निधीची तरतूद होत असताना देखील त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे .

नगर परिषद कामठी अंतर्गत प्रभाग क्र. 15 येथील गौतम नगर, जुनी छावणी कामठी या भागामध्ये गेली कित्येक वर्षापासुन घाण व दुर्गंधीयुक्त पाण्याच्या पुरवठा होत असल्यामुळे नागरीक त्रस्त झालेले आहेत. तसेच खराब पाणीपुरवठ्यामुळे या भागामध्ये टायफाईड, पिलीया, डायरीया सारखे असंख्य आजार पसरत असून येथील नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या दूषित पाणीपुरवठयामुळे या भागातील . सचिन चांदोरकर, स्वेता मानकर,. मनोज पिल्लेवान, संकेत गजभिये, गौतम गजभिये व या भागातील असंख्य नागरीक आजारी पडत आहेत. तसेच काही जण येथील माहुरे हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ उपचार घेत आहेत तरी नगर परोषद प्रशासनाने प्रभाग क्र 15 ची ही दूषित पाण्याची समस्या त्वरित मार्गी लावावी अशी मागणी जोर धरत आहे.

संदीप कांबळे कामठी