Published On : Mon, Jun 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात धक्क्यावरून वाद; मध्यस्थीला आलेल्या भावाच्या पोटात चाकू, दोघांना अटक

Advertisement


नागपूर-नागपुरातील यशोधरा नगर परिसरात किरकोळ धक्काबुक्कीचे प्रकरण थेट जीवघेण्या हल्ल्यात परिवर्तित झाले. फळ विक्रेत्या तरुणाशी झालेल्या वादातून मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्याच्या भावावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटाभट्टी परिसरात राहणारा रेहान अन्सारी (20) हा नेहमीप्रमाणे फळांचा ठेला लावून जवळील दारूभट्टी परिसरात पाणी पिण्यासाठी गेला होता. परत येत असताना त्याचा धक्का सूरज कुमरे याला लागला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

काही वेळाने सूरज कुमरे हा त्याचा साथीदार विवेक भोळा याच्यासह पुन्हा घटनास्थळी आला. दोघांनी रेहानला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. वाद वाढत असल्याचे पाहून रेहानचा मोठा भाऊ फैजान अन्सारी (20) हा मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याचवेळी सूरज कुमरे याने फैजानच्या पोटात चाकूने वार केला, तर विवेक भोळा याने त्याला मारहाण केली. या हल्ल्यात फैजान गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण, जीवे मारण्याची धमकी यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.