Published On : Wed, May 15th, 2019

ड्राप अ‍ॅण्ड गो मध्ये थांबतात वाहने

रेल्वे स्थानकावर अवैध पार्किंग

नागपूर: प्रवाशांना सोयीचे व्हावे म्हणून रेल्वे प्रशासनाने ड्राप अ‍ॅण्ड गो ची व्यवस्था केली. अर्थात प्रवाशांना सोडा आणि पुढे चला असा याचा अर्थ होतो. मात्र, पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रेल्वे स्थानकाच्या पहिल्याच ड्राप अ‍ॅण्ड गो मध्ये वाहने तासनतास थांबून असतात. या प्रकारामुळे सामान्यांची चांगलीच धावपळ उडते. याशिवाय पश्चिमेकडील पार्सल कार्यालयाजवळच फुटपाथवर अवैध पार्किंग केली जाते. मात्र, त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.

Advertisement

देशाच्या हृदयस्थानी असलेले नागपूर रेल्वे स्थानकाहून दररोज १५० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या धावतात. तसेच ३० ते ३५ हजार प्रवाशांची वर्दळ असते. सायंकाळच्या वेळीतर प्रचंड गर्दी होते. रेल्वे स्थानकाच्या बाहेर पर्यंत वाहनांच्या रांगा असतात. ड्राप अ‍ॅण्ड गोसाठी दोन रांगा आहेत. त्यापैकी पहिल्याच म्हणजे व्हीआयपी रोमध्ये वाहने थांबून असतात. त्यामुळे मागुन येणाºया वाहनांना पुढे जाण्यासाठी जागाच मिळत नाही. याशिवाय पार्सल कार्यालयाजवळच फुटपाथवर दुचाकी पार्क करून ठेवल्या जातात. याप्रकारामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. वेळ प्रसंगी भांडणेही होतात. या ठिकाणी आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस अशा दोन सुरक्षा यंत्रणा आहेत. दोन्ही यंत्रणांंच्या कर्मचाºयांनी यापूर्वी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे आता होत असलेली वाहनांची गर्दी लक्षात घेता कुठेही आणि कशाही पध्दतीने वाहन पार्क करणाºयांवर कारवाई व्हावी.

यापुर्वी येथून दुचाकी चोरीचे प्रकार घडले आहेत. अलिकडेच लोहमार्ग ठाण्यातील एका महिला कॉन्स्टेबलची दुचाकी ठाण्यासमोरूनच चोरी गेली. अद्याप त्यांचे वाहन मिळाले नाही. मनात येईल त्या ठिकाणी पार्किंग होत असल्याने वाहन चोरीची शक्यता नाकारता येत नाही आणि याचे खापर सुरक्षा यंत्रणांवर फोडले जाते. त्यामुळे अवैध पाकि ग आणि ड्राप अ‍ॅण्ड गो मध्ये वाहने थांबवून ठेवणाºयांवर कारवाई व्हावी, अशी प्रवाशांची ओरड आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement