Published On : Wed, May 15th, 2019

बॉम्बशोधक तीन श्वान आरपीएफच्या ताफ्यात

श्वान पथकात ट्रॅकरचाही समावेश, आठ महिण्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठविणार पुण्याला

नागपूर: मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानक देशाच्या हृदयस्थानी आहे. संवेदनशील यादीत नागपूरचा समावेश होता. ही बाब लक्षात घेता आरपीएफच्या ताफ्यात चार श्वानांचा समावेश झाला आहे. यात बॉम्बशोधक तीन तर एक ट्रॅकरचा समावेश आहे. आरपीएफच्या सोबतीला चार श्वान आल्याने घातपात करणाºया तसेच गुन्हेवारांना हुडकुन काढण्यास या श्वानांची मदत होईल.

नवीन पाहुण्यात रियो, रॉनी, रॉ आणि ब्राओ यांचा समावेश आहे. आधी आरपीएफ कडे एकून ८ श्वान होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर अलिकडेच तीन श्वान निवृत्त झाले. त्यामुळे नागपूर विभागात केवळ चार श्वान होते. ही बाब लक्षात घेता मुख्यालयाने नुकतेच चार श्वान नागपूर आरपीएफला दिले आहेत. या चारही श्वानांना १२ जानेवारीपासून पुण्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल. आठ महिण्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात हे श्वान कर्तव्यावर असतील. यापैकी ३ नागपुरात आणि १ बल्लारशाहला पाठविण्यात येणार आहे. ३ श्वानात दोन बॉम्ब शोधक तर एक ट्रकर आणि बल्लारशाहत १ बॉम्ब शोधक पाठविणार आहेत. आरपीएफच्या ताब्यात एकून ८ श्वान आहेत असे म्हणन्यास हरकत नाही. या आठही श्वानांची चांगलीच मदत होईल.

नागपूर रेल्वे मार्गे दररोज १५० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या धावतात. तर ४० हजार प्रवाशांची नियमीत वर्दळ असते. याशिवाय नागपूर स्थानकावर घातपात करण्याचा ईशारा यापूर्वी देण्यात आला होता. तसेच रेल्वे गाडीत घातपात करणाºया वस्तु असल्याची सूचना अनेकदा सूरक्षा यंत्रणेला मिळाली. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीत गाड्यांची तपासणीही बरेचदा करण्यात आली. यापार्श्वभूमिवर आलेले नवीन पाहुणे महत्वाचे ठरणार आहेत. रेल्वेत चोरी आणि तस्करीच्या घटना नित्याच्याच भाग झाल्या आहेत. अलिकडेच रेल्वेस्थानकावर लावण्यात आलेल्या सिसीटीव्हीमुळे या घटनांवर काही प्रमाणात आळा बसला आहे. मात्र, त्या पूर्णता नियंत्रणात आलेल्या नाही. नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांनी आजवर विशेष पथकाच्या माध्यमातून या प्रकारांच्या प्रतिबंधासाठी आघाडी घेतली होती. मात्र, मर्यादीत मानवसंसाधन आणि रेल्वेचा वाढलेला पसारा यामुळे या कामाला अनेक मर्यादा पडत होत्या. मानवी क्षमतांच्या मर्यादामुळे अनेकदा हातचे सावज निसटून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे यासाठी विशेष प्रशिक्षणप्राप्त श्वानपथकाचा वापर यापुढे केला जाणार आहे. आता श्वानपथक भक्कम झाले असून यामुळे चोरी आणि तस्करीच्या घटनांना प्रतिबंध बसेल, गुन्हेगारांना शोधून काढण्यास त्यांची मदत मिळेल. शिवाय घातपात करणाºया वस्तु शोधुन काढण्यास श्वानांची महत्वपूर्ण भूमिका असेल.
तीन श्वान नागपुरात

रियो, रॉनी आणि ब्राओ हे तीन्ही श्वान लेब्राडोर जातीचे असून ते बॉम्ब शोधक आहेत. तर रॉ हा श्वान डोबरमॅन जातीचा असून तो ट्रॅकर म्हणजे गुन्हेगारांना शोधण्याचे काम करेल. रीयो, रॉनी आणि रॉ असे तीन श्वान नागपुरात तर ब्राओ ला बल्लारशाह येथे कर्तव्यावर पाठविण्यात येणार आहे.