Published On : Thu, Dec 12th, 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर’चे कार्य लवकर पूर्ण करावे

– पाहणी दौऱ्यात श्रीमती शीतल तेली-उगले यांचे कंत्राटदारांना निर्देश

नागपूर: नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त तथा नासुप्र सभापती श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज बुधवार, दिनांक ११ डिसेंबर रोजी कामठी रोडवरील मौजा इंदोरा येथे नागपूर सुधार प्रन्यासतर्फे तयार करण्यात येत असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर’ची पाहणी केली.

यावेळी नामप्राविप्र’चे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार, नामप्राविप्रच्या अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर, सहाय्यक अभियंता नेपाल भाजीपाले, कंत्राटदार मेसर्स डी ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनी व न्यू-लूक फ़र्निशरचे प्रतिनिधी उपस्थित होते.