Published On : Sat, Aug 22nd, 2020

डॉ. शारदा रोशनखेडे यांना डि.लीट नुकतीच प्रदान

Advertisement

– ओएमजी, वर्ल्ड ऑफ बुक मध्ये नोंद

नागपूर. जगदंबा शिक्षण संस्था कोराडी द्वारा संचालित तेजस्विनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोराडी येथील तंत्रस्नेही, शिक्षिका डॉ. शारदा कृष्णकांत रोशनखेडे यांना डॉक्टरेट ऑफ लिटरेचर या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी सेंट मदर तेरेसा हॉरवर्ड विद्यापीठ अॅफिलेटेड टू कॅम्ब्रीज विद्यापीठ येथून आपले संशोधन पूर्ण केले. संशोधनातील ग्रामीण भागातील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा अभ्यास सवयी त्यावर सामाजिक-आर्थिक स्तरांचा प्रभाव हा विषय घेऊन पूर्ण केले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा पूरेपूर फायदा घेत विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम ऑनलाइन द्वारा राबविले. कोविड-19 पॅंडेमिक अवेरनेस क्वीज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून उदाहरणार्थ रत्नागिरी, सातारा, सांगली, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नगर येथून पास केल्या.

27 वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात विद्यार्थिनीचे अनुभव विषद करणारे “माझे विश्व लेकरांचे ” हे पुस्तक तयार केले. ऑनलाईन टीचर ट्रेनिंग सुद्धा केलेत, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन कार्यशाळा कोरोना विषाणूशी संबंधित जनजागृतीच्या दृष्टीने घेतल्या. त्यामुळे त्यांना को रो ना योद्धा म्हणून अमेझिंग इंडिया प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. लॉकडाऊन च्या 40 दिवसात तब्बल 50 पेक्षा जास्त उपक्रम राबवल्याची दखल घेत ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली.आतापर्यंत त्यांना शिक्षकरत्न राज्य पुरस्कार नॅशनल टीचर इनोव्हेशन अवार्ड डॉ.एपीजे अब्दुल कलाम ज्ञानस्त्रोत नॅशनल अवॉर्ड, कर्मयोगी पुरस्कार, ग्लोबल स्कूल नॅशनल अवॉर्ड इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

२७ सप्टेंबर 2020 ला दिल्ली येथे “डायनॅमिक टीचर ऑफ द इयर ” साठी त्यांच्या नावाची निवड झाली आहे. त्या म्हणाल्या हे सर्व प्रकारचे यश शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि माझे कुटुंब हे आहेत. संस्थाध्यक्षांनी त्यांचा सत्कार केला व कौतुक केले. आणि त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.