Published On : Sat, Aug 22nd, 2020

राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारविजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई – भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, महिला हॉकीपटू रानी रामपाल यांचे तसेच द्रोणाचार्य पुरस्कारविजेते प्रशिक्षक, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि तेनसिंग पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारने आज पाच खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी, तेरा प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी, सत्तावीस क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी, पंधरा खेळाडूंची ध्यानचंद पुरस्कारासाठी तर आठ खेळाडूंची तेनसिंग पुरस्कारासाठी निवड जाहीर केली. या सर्व खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या यादीत घोडेस्वारीसाठी अजय सावंत, कुस्तीपटू राहूल आवारे, खोखोपटू सारिका काळे, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर, पॅरास्विमिंग सुयश जाधव यांची, तर ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांच्या यादीत बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे आदी खेळाडूंचा समावेश असून यांच्यासह राज्यातील व देशातील सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Advertisement

पुणे येथील लक्ष्य इन्ट्यिट्यूट आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्‌ मॅनेजमेंट या संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement