Published On : Mon, Nov 28th, 2022

डॉ. रतिराम चौधरी यांच्‍या महाआघाडीच्या उमेदवारावर दणदणीत विजय

Advertisement

आधिसभा (सिनेट) विद्यापीठ निवडणूक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्‍या अधिसभा (सिनेट) निवडणुकीत महाविद्यालयीन शिक्षक गटात (अनूसुचित जमाती) प्रवर्गातून विद्यापिठ शिक्षण मंचाचे उमेदवार डॉ. रतिराम गोमाजी चौधरी यानी महाआघाडीच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर दणदणीत विजय मिळविला आहे. महाविद्यालयीन शिक्षक गटात (अनुसूचीत जमाती) प्रवर्गातून डॉ. रतिराम चौधरी यांची उमेदवारी होती.

या निवडणुकीत ३८७६ मतदारानी मतदान केले असून त्यापैकी १५६ मते अवैध ठरली व डॉ. रतिराम चौधरी यांना २०४५ मते तर प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले डॉ.घनश्याम बगडे यांना फक्त १०६५ मते मिळाली तर डॉ. सुनील कोडापे यांना ६१० मते मिळाली. डॉ. रतिराम चौधरी यांनी डॉ.घनश्याम बगडे यांच्या ९८० इतक्या प्रचंड मताने पराभव केला. डॉ.घनश्याम बगडे हे मागील दोन वेळेच्या अधिसभा (सिनेट) सदस्य होते. एवढ्या बलाढय व्यक्तीला हरविण्याचा पराक्रम डॉ. रतिराम चौधरी यांनी केला आहे. डॉ. रतिराम चौधरी हे सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक व रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे.

डॉ. रतिराम चौधरी यांनी निवडणुकीतील यशाचे श्रेय शिक्षण मंचाचे अध्यक्षा डॉ. कल्पनाताई पांडे, महामंत्री डॉ.सतीश चाफले व इतर पदाधिकारी सदस्य, व माझ्या विजया करीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे परिश्रम करणाऱ्या सर्व शिक्षक मतदार बंधू व भगिनींना असल्याचे त्यांनी सांगितले. एस . पी . एम चे अध्यक्ष सुनीलकुमारजी पोरवाल , सचिव विजयजी शर्मा , डायरेक्टर अशोकजी भाटिया, सीईओ डॉ. एम. एन. घोषाल, सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण, उपप्राचार्य , आणि डॉ.तुषार चौधरी, डॉ.सुदीप मोंडल व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, तसेच रसायनशास्त्र विभागातील इतर प्राध्यापक, संशोधक अभ्यासक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह अनेकांनी त्यांचे निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले.