Published On : Thu, Sep 19th, 2019

शासकीय उपजिल्हा रुग्णालयात डॉ राजेश द्विवेदी वर हल्ला प्रकरणात दोन आरोपीवर गुन्हा दाखल,

Advertisement

एक वडील आरोपी अटक , अल्पवयीन पुत्र आरोपी अटकेबाहेर

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश द्विवेदी यांच्यावर संतप्त जख्मि रुग्णाच्या वडीलाने अंगावर हात उगारून मारझोड करीत हल्ला केल्याची घटना काल 17 सप्टेंबर ला दुपारी सव्वा वाजेदरम्यान घडली होती तेव्हा अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती न व्हावी व सदर घटनेतील आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संप पुकारला होता .मात्र अतिशयोक्ती प्रकरणात रुग्णांना रुग्णसेवा मिळावी यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याची सोय करण्यात आली होती ज्याचा रुग्णांनी वैद्यकीय लाभ घेतला तसेच या प्रकरणात दोन पिता पुत्र आरोपी वर गुन्हा नोंदवित आरोपी वडील साजिद अनवर खान उर्फ गुड्डू वय 38 वर्षे रा आझाद नगर कामठी असे आहे या आरोपीला दिवाणी न्यायालयात हजर केले असता आरोपीला पुढील 14 दिवसापर्यंत नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे तसेच दुसरा पुत्र आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यास अटक करण्यात आलेली नाही.

प्राप्त माहितीनुसार नियमित रित्या आकस्मिक विभागात जख्मि वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश द्विवेदी हे रुग्ण तपासणी करते वेळी चंद्रमनी नगर रहिवासी एक 17 वर्षोय रुग्ण उजव्या पायाला असलेल्या जखमांवर उपचार करण्यासाठी आई वडिलांसोबत आले असता उपचारा दरम्यान रुग्णाला इंजेक्शन लावून द्या ही मागणी केली असता इंजेक्शन लावणारी परिचारिका जेवणाला गेले असल्याने काही वेळ थांबायचे सांगितले असता दरम्यान वैद्यकीय अधिकारी व रूग्णचे वडील यांच्यातील झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला जाऊन मारहाणीत पोहोचला दरम्यान जख्मि रुग्णाच्या संतप्त वडिलाने डॉक्टर राजेश द्विवेदी च्या तोंडावर हातबुक्क्याने मारहाण करून जख्मि केले.वेळीच उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचारी तसेच नागरिकांनी मध्यस्थी ची भूमिका घेत वाद सोडविला. मात्र मारझोड करणाऱ्या संतप्त अज्ञात इसमाने वैद्यकीय पावतीत नाव नमूद असलेली पावती घेऊन दवाखान्यातून पळ काढल्याने मारझोड करणाऱ्या या अज्ञात इसमाचा शोध लागू शकला नव्हता मात्र .घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे , दुय्यम पो नि परदेशी व डी बी पथकांनी त्वरित घटनास्थळ गाठून आरोपीची ओळख पटवण्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करीत शोधकामी रवाना होत।आरोपीचा शोध लावून उशिरा रात्री काल या दोन्ही आरोपी वडील पुत्रावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाही करण्यात आली.

या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी शाब्दिक वादासह त्यांचा अंगावर चढून जाणे हे नित्याचीच बाब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे तर अपुऱ्या अधिकारी कर्मचाऱ्या अभावी दैनंदिन एक हजार रुग्णांची ओपीडी सांभाळणे हे जिकिरीचे काम झाले आहे तर सदर घटणेचा निषेध नोंदवित रुग्णालयात खुद्द अधिकारी कर्मचारी असुरक्षित असल्याची बतावणी करीत रुग्णालयात असलेली पूर्ववत बंद पडलेली पोलीस चौकी त्वरित सुरू करावी अशी मागणी जोर धरीत काल पासून डॉक्टरांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले होते मात्र आरोपीची अटक होताच समस्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन मागे घेत पूर्ववत वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू केली मात्र या घटनेची पुनरावृत्ती न व्हावि यासाठी या शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील पूर्ववत बंद पडलेली पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी वैद्यकीय अधीक्षक डॉ धीरज चोखांदरे यांनी केली आहे

संदीप कांबळे कामठी