Published On : Thu, Sep 19th, 2019

रणाळ्यात एक महिन्याचा छकुलीचा गळा आवरून खून

कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील सत्त धम्म बुद्ध विहार जवळ एक महिन्याच्या छकुलीचा गळा दाबून जीव घेत नजीकच्या गाईच्या गोठ्यातील किचळात मृतदेह फेकल्याची हृदयविदारक घटना मध्यरात्री 2 दरम्यान घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचे मुख्य कारण अजूनही गुलदस्त्यात असून पोलिसांनी मृतक छकुलीच्या आई व आजीला संशयित रित्या ताब्यात घेतले आहे .

प्राप्त माहिती नुसार सदर मृतक छकुलीचा मौदा तालुक्यात येणाऱ्या अरोली गावातील एका गरीब मोलमजुरी करणाऱ्या अनिल कनोजे यांच्या कुटुंबात श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी जन्म झाला. ही गोंडस छकुली जन्माला आल्याने कुटुंबात आनंदाची लहर पसरली मात्र हिची प्रकृती बरी राहत नसल्याने हिला उपचारार्थ कामठी येथील प्रसिद्ध सायली चिल्ड्रिंरेन हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याचे कारण दर्शवित उपचारार्थ दिवसाला हजार रुपयांच्या वर खर्च येणार असल्याची बतावणी केल्यावर हा खर्च पेलणारा नसला तरीही कुटुंबीय सदस्यांनी उपचार सुरूच ठेवला काही दिवसांनी उपचारात चांगला प्रतिसाद आल्याने आठवड्यातील तीन तीन दिवसानंतर उपचारार्थ अरोली वरून कामठी ला यायचे यानुसार काल 18 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता मृतक छकुलीची आई पायल अनिल कनोजे, वडील अनिल उत्तम कनोजे, काका सुनील उत्तम कनोजे, आजी पुस्तकला उत्तम कनोजे हे कामठी ला सायली हॉस्पिटल ला येऊन छकुलीची तपासणी करून नातेवाईक असलेल्या रणाळा येथील करण मुरारी बर्वेकर यांच्या कुटुंबात रात्रभर थांबा करून दुसऱ्या दिवशी गावाकडे प्रस्थान करणार असल्याचे नियोजित होते.

Advertisement

यानुसार रात्रभर सगळे कुटुंबीय सदस्य निवांत झोपेत असतेवेळी मृतक मुलीची आई मध्यरात्री 2 वाजता उठली असता कडेला असलेली एक महिन्याची छकुली दिसत नसल्याने चिंताग्रस्त झाले शोधाशोध करूनही कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने एकच चर्चेचा विषय ठरवीत कुटुंबात धडपड वाढली या घटनेची माहिती त्वरित नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिले असता पोलिसांनी वेळीच पोहोचून घरझडती घेतली मात्र हाती काहीही पुरावा न लागल्याने संशय फिरवीत मृतक छकुलीच्या आई व आजी ला पोलीस खाक्या दाखवताच आईने मृतकेची आजी ही छकुलीला ज्या मार्गाने घेऊन गेली त्या दिशेने मृतक छकुलीच्या आई सोबत गेले असता गावातील रंजित लोणारे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत पांडुरंग गणेर यांचे गाई म्हशी बांधले असलेल्या गाईच्या गोठ्यातील एका कोचड भरलेल्या खड्ड्यात सदर छकुलीचा मृतदेह फेकल्याचे निदर्शनास आल्याने सर्वांनी दुःखाचा एकच हंबरडा फोडला यावेळी पोलिसांनी सदर घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत घटनेचे गूढ रहस्य उलगडण्यासाठी तसेच सदर घटनेतील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी संशयित मृतक छकुलीची आई पायल कनोजे व आजी पुस्तकला कनोजे ला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू आहे.

Advertisement

या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तसेच चौकशीअंती घटनेचे सत्य रहस्य उलगडणार तर या घटनेत सासू व सून एकमेकांकडे छकुलीचा जीव घेतल्याचे बोट दाखवीत आहेत. पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मृतक एक महिन्याच्या छकुलीच्या पाठीमागे 2 वर्षाचा आर्यन नावाचा भाउ आहे …मात्र या हृदयविदारक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement