Published On : Mon, May 18th, 2020

डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते गरिबांना अन्यधान्य कीटचे वितरण

Advertisement

कामठी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व समाजकार्य महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते कामठी शहरातील अतिमागास वस्त्यांतील गरीब परिवारांना अन्नधान्य कीट वितरित करण्यात आल्या. कोविड-१९ या रोगाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांनी प्राध्यापकांना समाजकार्याची जाणीव करून देऊन गरजू लोकांना प्रत्यक्ष मदत करण्याची योजना तयार केली.

या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात कामठी शहरातील निरनिराळ्या स्लम भागागांतील दलित, नवबौद्ध, आदिवासी, भटके-विमुक्त, मुस्लीम अशा विविध घटकांतील परिवारांना डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाल, कॉलेजचे कार्यकारी प्राचार्य डॉ.रमेश सोमकुवर, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे, नगरसेविका संध्या रायबोले, सामाजिक कार्यकर्ते उज्वल रायबोले प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांनी विक्तुबाबा नगर, शिवनगर, इस्माईलपुरा आदी भागांतील अनेक गरीब परिवारांना जीवनावश्क किराणा साहित्याने भरलेल्या कीट व मास्क मोठ्या संख्येने वितरित केल्या. या वेळी सर्व गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता. सर्वांनी डॉ. पूरणचंद्र मेश्राम व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

या उपक्रमात महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. रमेश सोमकुवर, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम,डॉ. रुबीना अन्सारी, प्रा. उज्वला सुखदेवे, प्रा. मनोज होले, प्रा. ओमप्रकाश कश्यप,प्रा. अवेशखरणी शेख, शिक्षकेतर कर्मचारी गजानन कारमोरे, वसंत ता‌ंबडे, नीरज वालदे, शशील बोरकर आदींनी मोलाचे सहकार्य केले.

संदीप कांबळे कामठी