Published On : Mon, May 18th, 2020

कामठी तालुक्यात पुन्हा एक पॉजीटिव्ह

Advertisement

भिलगाव मध्ये कोरोनाचा शिरकाव, पोलीस कर्मचारीच निघाला कोरोना पॉजिटिव्ह

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कामठी तालुक्यात 23 मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे दरम्यान कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आल्या नंतर ही कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 16 येथील एक तरुण 12 एप्रिल ला कोरोना बाधित आढळल्याने हा परिसर 28 दिवसासाठो प्रतिबंधित करण्यात आले होते या कालावधीत कोरोना बाधित तरुणाचा अहवाल हा निगेटिव्ह आल्यानंतर सदर तरुण बरा झाल्याचे गृहीत धरून 26 एप्रिल ला त्याच्या स्वगृही पाठवीत हा तालुका कोरोनामुक्त झाल्याची स्थिती निर्माण झाली होती मात्र काल 16 मे ला तालुक्यातील भिलगाव गावातील श्री हरी नगरी रहिवासी एका पोलीस कर्मचाऱ्यांचा नमुना निगेटिव्ह आल्याने सदर पोलीस कर्मचारी कोरोनाबधित झाल्याचे निदर्शनास आल्याने कामठी तालुक्यात पुन्हा एक पॉजिटिव्ह आढळल्याने भिलगाव गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सदर कोरोनाबाधित रुग्ण हा तहसील पोलीस स्टेशन मध्ये डी बी मध्ये कार्यरत होता तर याला कोरोना बाधित असल्याचे कुठलेही लक्षण दिसुन येत नव्हते तरी खबरदारी म्हणून तहसील पोलीस स्टेशन जवळ असणाऱ्या एका शासकीय रुग्णालयात च कोरोना ची चाचणी करण्यात आली होती या स्वबच्या नमुन्याचा अहवाल काल 16 मे ला आल्या नंतर सदर पोलीस कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास येताच सर्वाना एकच धक्का बसला तसेच काल रात्री 10 वाजता तहसीलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर , यशोधरा नगर पोलीस स्टेशन च्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित भिलगाव येथील श्रीहरी नगरी गाठून सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून परिसर पुढील 14 दिवसासाठी 31 मे पर्यंत सीलबंद करण्यात आले तसेच कोरोना बाधित आढळलेल्या त्या पोलीस कर्मचऱ्यासह सहपाठी असलेले अजून चार पोलीस कर्मचारी व कोरोना बाधित आढळलेल्या त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील 9 सदस्यांना नागपूर येथील पोलीस ट्रेनिंग सेंटर मधील शास्कोय विलीगिकरन कक्षात पुढील 14 दिवसासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच कोरोनाबधित आढळलेलया त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या त्या परिसरातील 39 कुटुंब व 139 व्यक्तींना गृह विलीगी करण करण्यात आले असून त्या परिसरात आज 3 आरोग्य पथका च्या सहाय्याने त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे.

सदर कोरोना बाधित पोलीस कर्मचारी हा स्वस्थ असून याला कुठलेही असे लक्षण दिसुन येत नव्हते तर हा सर्वत्र बिनधास्त बाळगत होता तसेच ज्या दिवशी कोरोना पोजिटिव्ह अहवाल आला त्या दिवशी खुद्द पोलीस स्टेशन ला हजर होता तसेच गावातील कित्येक लोकांच्या संपर्कात आल्याने भीलगाव गावात या कोरोना चा भूकंप तर होणार नाही ना याची ही भीती बाळगण्यात येत आहे तर यासंदर्भात कामठी तालुका प्रशासन संवेदनशील भूमिका घेऊन सतर्कता बाळगत आहे तसेच नागरिकांनी यासंदर्भात खबरदारी बाळगुण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा असे आव्हान तहसिलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement