Published On : Tue, Apr 17th, 2018

डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्य विविध विकास कामांचे प्रभाग क्र २६ च्या वतीने भुमीपुजन

नागपूर: परमपुज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्य महानगरपालिका प्रभाग क्र २६ च्या वतीने पडोळे नगर येथील समाजभवनाची रंगरंगोटी व ग्रीन जीमचे उद्घाटन व शिवनकर नगर येथील समाज भवनचे लोकार्पण पुर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचे हस्ते करण्यात आले.

नगरसेवक ॲड धर्मपाल मेश्राम यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या ह्या विकास कार्यांचे भुमीपुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक ॲड यशवंत मेश्राम होते.

Advertisement

कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा. प्रमोद पेंडके, परिवहन समिती सभापती बंटीभाऊ कुकडे, प्रा हर्षल घाटोळे, राजेश संगेवार, विनोद बांगडे, सचिन काळबांडे, इंद्रजित वासनिक, सिमा ढोमणे, राजू गोतमारे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र जिवतोडे, प्रिया परमार, गायत्री उचितकर, कल्पना सारवे, सुरेश बारई, बाबा चंद्रिकापुरे, बंडु बोरकर, राजेश देशभ्रतार, रमेश दोनाडकर, धीरज सोमकुवर, विलास कुराडे, भुपेंद्र अंधारे, राम सामंत व बरेच पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement