Published On : Wed, Feb 12th, 2020

अशोक मेंढे यांनी डॉ. आंबेडकर रिसर्च सेंटरची केली पाहणी

नागपूर: कळमेश्वर मार्गावरील चिचोली येथील शांतीवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे.

रिसर्च सेंटरचे आतापर्यंत झालेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी बुधवार, दिनांक १२ फेब्रुवारी रोजी डॉ. आंबेडकर फाऊंडेशन, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष श्री. अशोक मेंढे यांनी शांतीवन परिसराचा दौरा करून सदर रिसर्च सेंटरची पाहणी केली.

सदर रिसर्च सेंटर व परिसराचा विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, भारत सरकार यांच्यातर्फे रुपय १७.०३ कोटीची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

या संदर्भात अशोक मेंढे यांनी आज कार्यस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन कार्याचे निरीक्षण केले. झालेल्या कार्यावर समाधान व्यक्त करत उर्वरित कार्य लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी भारतीय बौद्ध परिषदेचे सचिव श्री. संजय पाटील, नामप्रविप्राचे अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता(प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर, सहायक अभियंता श्री. पंकज पाटील, वास्तुशास्त्रज्ञ श्री. संदीप कांबळे तसेच नामप्रविप्राचे अधिकारी व कत्रांटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.