Published On : Wed, Feb 12th, 2020

हैदरी चौकातील युनिएन बॅँक एटीएम केंद्रात चोरी

-नगदी 78 हजार 500 रुपयांची चोरी, आरोपी अज्ञात

कामठी ता प्र 12:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हैदरी चौकातील युनियन बँक एटीएम केंद्र तसेच जयस्तंभ चौकातिल बँक ऑफ इंडिया एटीएम केंद्र तसेच अग्रवाल भवन येथील एटीएम केंद्रातील तिन्ही मशीनचे असेंबी तोडून अज्ञात चोरट्याने एकूण नगदी 78 हजार 500 रुपयांची चोरी केल्याची घटना 31जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान रात्री 12 .45दरम्यान घडली असून यासंदर्भात एटीएम केंद्राचे संबंधित प्रतिनिधी फिर्यादी छगन चोरमार वय 33 वर्षे रा पारडी नागपूर ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून तीन एटीएम केंद्रातून 78 हजार 500 रुपयांची चोरी केल्या प्रकरणात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 379, 34 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी