कन्हान : – श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे १५ आक्टोंबर ” वाचन प्रेरणा दिवस ” कार्यक्रमाने डॉ अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते. आजच्या २१ व्या शतकातही हे आपल्या ला तंतोतंत पटणारे आहे. आजचा शाळेत जाणारा विद्यार्थी असो वा महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना टी.व्ही, स्मार्ट फोन, टॅबलेट, कॉम्प्युटर या पासून बाजूला करुन त्यांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. हा दिवस त्या दिना पुरता मर्यादीत न राहता नेहमीच पुस्तक, मासिक, साहित्य यांचे वाचन व्हावे ही आमची प्रामाणिक भावना आहे.
असे उपदेश महाविद्यालयातील कार्यकारी प्राचार्या डॉ.सुप्रिया पेंढारी यांनी दिले. म्हणून याच उद्देशाने श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे माजी राष्ट्रपती स्व. डाॅ.ए.पी. जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयात प्राध्यापक डॉ. ऋषीकेश गोरे, श्री ढोरे, सारिका सूर्यवंशी, कु.पल्लवी ठाकरे, डीमु महल्ले, खुशाल शेंडे उपस्थित होते.
