नागपूर : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांदरम्यान बुधवारी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवार बाजार परिसरातील कमला नेहरू कॉलेजजवळ दोन अज्ञात तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. घटनेनंतर घटनास्थळी रक्ताचे डाग आणि संघर्षाचे चिन्हे आढळून आली आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकालाही तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. संपूर्ण परिसर सील करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक तपासात दोन्ही तरुणांवर मोठ्या दगडांनी हल्ला करून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे.
दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर हत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस विविध पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...
व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam
ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...





