Published On : Sat, Jul 20th, 2019

साटक येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कन्हान : – ग्राम पंचायत साटक च्या वतीने जि प शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अखिलेश हायस्कूल साटक सह गावातील सार्वजनिक स्थळी वृक्षारोपण करण्यात आले.

ग्राम पंचायत साटक च्या सरपंचा सिमाताई उकुंडे, उपसरपंच गजानन वांढरे व तरूण बर्वे, दिपक मोहनकर, सु़भाष बिरो, सौ सकुंतला मेश्राम, सौ शोभा देशमुख, सौ मंगला श्रावनकर, सौ निर्मला बावनकर, सौ गिता कंभाले ग्राम पंचायत सदस्य, सदस्या हयाच्या हस्ते जि प उच्च प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अखिलेश हायस्कूल साटक सह गावातील सार्वजनिक स्थळी ” झाडे लावा, झाडे जगवा ” चा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पाटील सर मुख्याध्यापक अखिलेश हायस्कुल साटक, डॉ वैशाली हिंगे आरोग्य अधिकारी साटक, रविंद्र गुडधे, मंगेश भुते कृषी मित्र, ठोंबरे कृषी सेवक, ईश्वर हिंगणकर, प्रेमचंद चामट, रमेश वांढरे, अमोल जगन देशमुख, राजु चोपकर अखिलेश हायस्कूल साटक येथील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.