Published On : Sat, Jul 20th, 2019

सेव मेरिट सेव नेशन तर्फे महा मोर्चा

Advertisement

दिनांक २० जुलै २०१९ ला सेव मेरिट सेव नेशन तर्फे गांधी चौक ते कलेक्टर ऑफिस पर्यंत येथे भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. या मोर्च्या मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतले. हा मोर्चा कोणत्याहि जाती किंवा धर्म विरोधी नसून, कोणत्याही राजकीय पक्ष विरोधी नव्हता. हा मोर्चा कोणत्याही जाती समूहाच्या विरुद्ध नसून तो मेरिट मध्ये आलेल्या विध्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी होता मग ते कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असो. हा संपूर्ण आंदोलन मेरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांशी जुडलेलेला आहे.

या आंदोलनाची सुरुवात होण्याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील आरक्षण हे ७५% टक्के च्या वर गेले असून त्यामुळे सर्वच जाती आणि प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांची परवड होत आहे. आतापर्यंत सर्वाधिक आरक्षण असलेले केवळ तामिळनाडू हे राज्य होते. घटना दुरुस्ती करून हे आरक्षण देण्यात आले होते. मात्र महाराष्ट्र राज्य हे आता सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य ठरलेले आहे.

याचा परिणाम असा होत आहे कि खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थाना अनेक महत्वाच्या सरकारी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळेनासा झाला आहे. हा प्रश्न फक्त खुल्या प्रवर्गाच्या मेरिट विद्यार्थानाचा नसून सर्व जाती समूहातील मेरिट विद्यार्थाना त्यात प्रवेश मिळण्याबाबतचा आहे. गुणवत्ता मरत असेल तर त्यात देशाचे नुकसान आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून या मोर्च्याला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. सेव मेरिट सेव नेशनच्या काही प्रमुख मागण्या आहेत १. आरक्षण हे ५०% च्या पुढे असून नये. २. या आंदोलनाचा पन्नास टक्के आरक्षणाला विरोध नाही मात्र मात्र दार पाच वर्षांनी आरक्षण धोरणाचे पुनर्विलोकन होणे आवश्यक आहे. आरक्षण खरेच गरजूला मिळतेय का हे बघितले जावे. ३. क्रिमीलेयर ची मर्यादा सर्वाना आखून देण्यात यावी त्यातकुणालाही सूट असू नये. ४. ५०% आरक्षणाला आमचा विरोध नाही. ५. मागेल त्याला आरक्षण याचे सेव मेरिट सेव नेशन विरोध करते.

या चळवळीला चंद्रपूरच्या बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि प्रतिष्ठान स्वइच्छेने बंद ठेवून सेव मेरिट सेव नेशनच्या या आंदोलनाला समर्थन दिले. या मध्ये चंद्रपूर कापड विक्रेता असोसिएशन, चंद्रपूर रेडिमेड कापड असोसिएशन, चंद्रपूर इनकम टॅक्स बार असोसिएशन, कॉन्स्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटरस असोसिएशन, चंद्रपूर, चंद्रपूर सराफ असोसिएशन, चंद्रपूर सी ए असोसिएशन ने समर्थन दिले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे सर्व पेट्रोल पंप है ३ वाजे पासून सायंकाळी ६ वाजयेपर्यं बंद होते. या मोर्चेत चंद्रपूर जिल्हातील विविध समाजातल्या पुरुष, महिला, वृद्ध सर्वानी आनंदाने सहभाग घेतले.

विशेषकर महिलांनी या मोर्च्यात आवर्जून भाग घेतले. मोर्च्यामध्ये उपस्थित सर्व नागरिकांनी या मोर्च्याचे समर्थन केले. किमान ____ च्या वर नागरिक या मोर्च्यात उपस्थित होते. या मोर्चेत नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया, वणी, मूल, भद्रावती, वरोरा, घुग्गुस व अनेक जिल्ह्यातून आणि तालुक्यातून नागरिकांनी सहभाग घेतले. हा मोर्चा गांधी चौक, चंद्रपूर येथून सुरु झाला आणि माननीय जिल्हा दंडाधिकारी कार्यालय येथे मोर्च्याचे समारोप झाले.

नागपूर शहरचे प्रख्यात वैद्यकीय चिकित्सक आणि सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळचे जनक डॉ. अनिल लद्दड यांनी मोर्च्याच्या समारोप होण्यापूर्वी मोर्च्या मध्ये उपस्थित नागरिकांना संबोधित केले. या मोर्च्यात कोणत्याही प्रकारचे कचरा होऊ नये म्हणून याची विशेष काळजी घेतली. २०० च्या अधिक स्वंयसेवक या मोर्च्या मध्ये आपली सेवा देण्यासाठी उपस्थित होते. या मोर्च्या मध्ये विविध प्रकारचे झांकी सजवून सेव्ह मेरिट सेव्ह नेशन च्या विचारांचे प्रदर्शन करण्यात आले. महाराष्ट्रच्या विविध ठिकाणी नागपूर, औरंगाबाद, गोंदिया व इतर जिल्हात आणि तालुक्यात सेव मेरिट सेव नेशन संबधी भव्य मोर्चे काढण्यातआले आणि चंद्रपूर मध्ये हि यशस्वीपणे हा मोर्चा संपन्न झाला.