Published On : Sat, Oct 12th, 2019

महावितरणच्या राज्यभरातील सहा हजार कर्मचाऱ्यांकडून रक्तदानाचे महादान

Advertisement

नागपूर: सामाजिक बांधिलकी जोपासत महावितरणच्या सुमारे साडेसहा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ११) एकाच दिवशी राज्यभरातील विविध कार्यालयांत आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेत रक्तदानाचे महादान केले. शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांना या रक्तदानाचा फायदा होणार आहे. एखाद्या शासकीय कार्यालयाने संपूर्ण राज्यात एकाच वेळी रक्तदान शिबीराची एवढ्या मोठ्या संख्येत यशस्वी आयोजन करणे व त्यात एवढ्या मोठया प्रमाणात कर्मचाऱ्यांनी सक्रीयपणे सहभागी होणे अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून या उपक्रमाचे सार्वत्रिक कौतूक होत आहे. या शिबिरात नागपुर परिमंडलातील ६६५ कर्मचा-यांसह महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल २ हजार १०२ कर्मचा-यांनी रक्तदान केले.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले. त्या आव्हानास मोठा प्रतिसाद देत महावितरणकडून राज्यातील विविध कार्यालयात ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आज रक्तदान करून महादानाचे कर्तव्य बजावले. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.

Gold Rate
18 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,700/-
Gold 22 KT ₹ 1,23,400 /-
Silver/Kg ₹ 2,02,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महावितरणच्या नागपूर येथील प्रकाशभवन स्थित दादाभाई सभागृह येथे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी स्वत: रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, अनिल घोगरे, दिलीप दोडके, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, राजेश घाटोळे, दिलीप घाटोळ, राहुल जीवतोडे, समीर टेकाडे, विनोद सोनकुसरे, प्रज्वला किरनाके, मंजुषा आडे, सहाय्यक महाव्यवस्थाफक (मानव संसाधन) वैभव थोरात, वर्कर्स फ़ेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदानामध्ये परिमंडलनिहाय सहभागी झालेले महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील एकूण सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे – मुख्य कार्यालय प्रकाशगड -१६४, बारामती परिमंडल -८०२, पुणे परिमंडल -११७, कोल्हापूर परिमंडल -६९२, रत्नागिरी परिमंडल -३७, नाशिक परिमंडल – ५००, औरंगाबाद परिमंडल -२३२, नांदेड परिमंडल -३०८, अकोला परिमंडल -४४६, नागपूर परिमंडल – ६६५, अमरावती परिमंडल -४४२, चंद्रपूर परिमंडल -३९६, गोदिया परिमंडल-१४३, लातूर परिमंडल -३८५, कल्याण परिमंडल -२९९, भांडूप परिमंडल – २४६, जळगांव परिमंडल – १४५

मुंबई येथे राज्यव्यापी उद्घाटन
महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करून या राज्यव्यापी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडीयर (सेवानिवृत्त) पवन कुमार गंजू, कार्यकारी संचालक सर्वश्री चंद्रशेखर येरमे, प्रसाद रेशमे, अरविंद भादीकर, दत्ता शिंदे उपस्थित होते. राज्यव्यापी रक्तदानाच्या महादानात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी कौतुक केले असून या रक्तदान शिबीराला सहकार्य करणाऱ्या शासकीय व निमशासकीय रक्तपेढ्यांच्या वैद्यकीय पथकांचे आभार मानले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement