Published On : Wed, Apr 15th, 2020

‘जिव्हाळा’च्या कार्यकर्त्यांनी केले रक्तदान

Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य : सात दिवस आयोजन

नागपूर : कोव्हिड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे वैद्यकिय सेवेसाठी रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. ही गरज ओळखून जिव्हाळा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ७ ते १४ एप्रिल दरम्यान दररोज रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक कार्यात योगदान दिले. सतत सात दिवस चाललेल्या रक्तदान शिबिराचा समारोप डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी करण्यात आला.

एका वेळी गर्दी होऊ नये म्हणून जिव्हाळा तर्फे सतत सात दिवस रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे मार्गदर्शक माजी खासदार अजय संचेती, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार नागो गाणार, आमदार मोहन मते, माजी महापौर प्रवीण दटके यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्रारंभी उपस्थितांनी सामाजिक अंतर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेबांचा संदेश आज खऱ्या अर्थाने अंमलात आणण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन घरी बसून कोरोनाविरुद्धचा संघर्ष करायचा आहे. ह्या संघर्षात कोरोनाला हद्दपार करायचे आहे, असा विचार उपस्थित पाहुण्यांनी मांडला.

जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष मेश्राम, सचिव तुषार महाजन, जयंत पाध्ये, नेहाताई लघाटे, अंगद जरुळकर, डॉ. सुमित पैडलवार, निखिल कावळे, प्रदीप कदम, प्रणव हळदे, विलास मसरे, आशुतोष बेलेकर, नीतेश समर्थ, व्यंकटेश होलगरे, रिद्दु चोले, केतन साठवणे, अभिजीत सरोदे, समीर भोयर, रोहित ठाकरे, सिद्धेश झलके, सारंग पेशन, निखिल चरडे, मोहीत भिवनकर, अपराजित फुलजले, निखिल कावळे, स्नेहल कुचनकर मोहित भिवनागर, आदित्य शास्त्रकार, प्रसाद हडप आदी पदाधिकारी व सदस्यांनी या सामाजिक कार्यात योगदान दिले. सामाजिक अंतराचे भान राखत आयोजित या रक्तदान शिबिरात ६५ व्यक्तींनी रक्तदान केले.