Advertisement
नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृहात खूनाची शिक्षा भोगत असलेला डाॅन अरूण गवळी याला कोरोना झाला आहे. तुरूंग अधीक्षक अनुप कुमार कुमरे यांनी याला दुजोरा दिला. सोमवार ८ रोजी वैद्यकीय चमूने गवळीची तपासणी केली.
त्या नंतर बुधवार, १० रोजी त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. लगेच त्याची ट्रिटमेंट सुरू करण्यात आल्याची माहिती कुमरे यांनी दिली. त्याला काढा सुरू करण्यात आला आहे.
शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर यांच्या खूनात २०१२ मध्ये अरूण गवळीला न्यायालयात शिक्षा ठाेठावण्यात आली.
Advertisement