नागपूर : कळमेश्वर नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बुडून तरुण डॉक्टराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.डॉ. राकेश दुधे (४१) असे मृत डॉक्टराचे नाव आहे.माहितीनुसार, दुधे हे कळमेश्वर नगरपरिषदेच्या जलतरण केंद्रात पोहण्यासाठी गेले होते. हे सुरु असताना अचानक ते बुडू लागले.
त्याठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांचे साथीदार आणि प्रशिक्षकांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी डॉ. दुधे यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. नाक-तोंडात पाणी गेल्याने त्यांना कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. जलतरण केंद्रात महिला, पुरुष आणि लहान मुलांसह असे एकूण ३०० सदस्य आणि दोन प्रशिक्षकांचा समावेश आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


