नागपूर : माजी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांच्या वैचारिक भूमिकेबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. विश्वास नांगरे पाटील यांचे वक्तव्य त्यांच्या वैयक्तिक विचारांचे आणि संस्कारांचे प्रतीक असून, त्याला राजकीय रंग देणे अथवा त्याचा विपर्यास करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले, “विश्वास नांगरे पाटील हे आपल्या कामामुळे आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वामुळे ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत जे गौरवोद्गार काढले, ते आदर्श संस्कार आणि भारतीय संस्कृती जपणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेतून आले आहेत. देशासाठी काम करणाऱ्या संस्थेबद्दल त्यांनी सकारात्मक मत व्यक्त केले असेल, तर त्यात गैर काहीच नाही.”
ते पुढे म्हणाले, “राज ठाकरे असोत किंवा इतर कोणतेही नेते, त्यांनी या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या विचारांनुसार मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. अशा विधानांवरून अनावश्यक वाद निर्माण करणे किंवा त्याला राजकीय स्वरूप देणे टाळले पाहिजे.”
राज्यात या वक्तव्यावरून विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत असताना, बावनकुळे यांनी संयमाची भूमिका मांडत कोणत्याही विधानाचा विपर्यास न करता त्याकडे व्यापक दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले. तसेच समाजात तेढ निर्माण होईल किंवा अनावश्यक राजकीय वाद वाढेल, अशी भूमिका कुणीही घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate





