Published On : Fri, Nov 12th, 2021

झिंगाबाई टाकळीत दिवाळी मिलन संगीतमय कार्यक्रम संपन्न

नागपूर – झिंगाबाई टाकळी नागरी कृती समितीतर्फे गीतांजली मैदान येथे दिवाळी मिलनचा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला.

याकार्यक्रमा प्रसंगी प्रभाग 11 च्या नगरसेविका संगीताताई गिरे, सुभाष मानमोडे, चिंटू कोहळे, नगरसेवक संदीप जाधव, योगेश ठाकरे, दीपक गिरे, ज्ञानेश्वर ठाकरे, सचिन मोहोळ, राजेंद्र बढीये, अमर खोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन संजय गायकवाड यांनी केले व संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राजन गावंडे यांनी केले. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत असून संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.