Published On : Wed, Jun 12th, 2019

गटशिक्षणाधिकारी काटोले व्दारा दिव्यांग अदिती यादव चा सत्कार

कन्हान : – इयत्ता १० वी बोर्डाच्या परिक्षेत दिव्यांग प्रवर्गात कन्हान ची कु. अदिती यादव हिचा जिल्हयात तृतीय व तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला बद्दल प स पारशिवनीचे गटशिक्षणाधि कारी काटोले हयानी सत्कार करून गौरव केला .

माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०१९ मध्ये १० वी च्या परिक्षेत धर्मराज विद्यालय कन्हानची कु अदिती मोहन कुमार यादव हिने ८४.६०% गुण प्राप्त करून दिव्यांगातुन नागपुर जिल्हयात तृतीय, तालुकातुन प्रथम क्रमांक व शाळेतुन व्दितीय क्रमांकाने उर्तिण होऊन आई, वडिलांचा, शाळेचा, तालुक्याचा नावलौकिक केल्या बद्दल पंचायत समिती पारशिवनी च्या वतीने गटशिक्षणाधिकारी विलास काटोले, समावेशिक तञ (दिव्यांग) चंदा बेझलकर, मुख्याध्यापिका वासनिक हयानी पुष्पगुच्छ व पेळा चारून सत्कार केला.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार एन एस मालविये सर, पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, पुरूषोत्तम बेले सर, नगरसेवक राजेश यादव, सुनिल लाडेकर सर, नंदलालजी यादव, नगरसेविका लक्ष्मीताई लाडेकर हयानी सुध्दा कु अदिती यादव चे अभिनंदन करून पुढील शिक्षणाच्या शुभेच्छा दिल्या.