Published On : Mon, Jul 29th, 2019

पैश्याच्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला

नागपूर: -जुन्या पैशाच्या वादातून आरोपीने आपल्या दोन साथीदारांसह खानावळीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर धारदार शस्त्राणे हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दि.२६ जुलै च्या रात्री ९.३० च्या दरम्यान बुटीबोरी पोलिस स्टेशन च्या हद्दीत घडली.देविदास किसन राठोड (४०) रा.लोकमत कॉलोनी बुटीबोरी असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून विनोद मेश्राम हा या घटनेतील मुख्य आरोपी आहे.

सविस्तर वृत्त असे की देविदास ह्याचा खानावळीचा व्यवसाय असून आरोपी विनोद हा त्याचा मित्र आहे.मागील तीन वर्षांपूर्वी देविदास याने आरोपी कडून ४० हजार रुपये उधार घेतले होते.वेळेवर पैसे परत करता आले नसल्यामुळे आरोपीने देविदास च्या घरातला टी वी आणि स्कुटी मोपेड ही जबरीने उचलून नेली होती.हलाखीची परिस्थिती असून देखील देविदास ने पैश्याची तडजोड करून आरोपीला त्याचे पैसे परत करून आपल्या घरातील वस्तू परत मिळविल्या.त्यानंतर त्या दोघांचे बोलणे बंद झाले होते.पैसे परत केले असून सुद्धा आरोपी हा वारंवार देविदासला पैश्याची मागणी करीत होता त्यामुळे त्या दोघांची नेहमीच शाब्दिक चकमक होत होती असे फिर्यादी देविदास ची पत्नी शोभा (३०) हिने पोलिसांना आपल्या लेखी तक्रारीत सांगितले.

Advertisement

घटनेच्या दिवशी देविदास हा नेहमी प्रमाणे आपल्या खानावळीतील डबे एम आय डी मधील दिनशा कंपनीत पोहचवून परत येत असतांना आरोपी व त्याच्या दोन साथीदारांनी एम आय डी सी वसाहत परिसरातील मुळक कॉलेज जवळ रस्त्यात अडवून परत पैश्याची मागणी केली.त्यामध्ये दोघांचे शाब्दिक भांडण झाले.भांडण विकोपाला जाऊन आरोपी विनोद आणि त्याच्या दोन साथीदारांनी देविदास वर कुऱ्हाड आणि धारदार चाकूने त्याच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले त्यात जखमी देविदास हा जागेवरच बेशुद्ध झाला.

Advertisement

त्याला मृत झालेला समजून आरोपीने आपल्या साथीदारासह घटनास्थळावरून पळ काढला.ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी प्रल्हाद भिसे याचे घर असल्याने त्याला देविदास हा गंभीर जखमी असल्याचे दिसून येताच त्याने याची माहिती त्याच्या घरच्यांना देऊन त्याला बुटीबोरी येथील माया रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे हलवायला सांगितले.नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना केल्याने सदर घटनेची माहिती तेथील पोलिसांनी बुटीबोरी पोलिसांना दिली असता हा प्रकार उघडकीस आला.बुटीबोरी पोलिसांनी नागपूर येथील शासकीय रुग्णालय गाठून सदर घटनेची नोंद करून आरोपीचा तपास सुरू केला असून बातमी लिहितोवर आरोपींना अटक झालेली नव्हती.पुढील तपास पो उ नि संजय भारती करीत आहे.

संदीप बलवीर, बुटिबोरी, नागपुर

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement