Published On : Fri, May 11th, 2018

छायाचित्र मतदार यादीचा पुनरिक्षणाला सुरुवात

Advertisement

Voter List
नागपूर:छायाचित्र मतदान यादीचा पुनरिक्षण करण्यात येत असून अद्याप ज्या पात्र मतदाराने मतदार यादीत नाव नोंदविले नाही अथवा मतदार यादीत नावात बदल असेल अशा मतदारांनी 15 मे पासून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदान यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 15 मे ते 20 जूनपर्यंत पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याकरिता किंवा पत्ता किंवा नावात बदल असल्यास मतदान नोंदणी यांच्या कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करावा. याच कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देवून पडताळणी करणार आहे.

31 जुलैपर्यंत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, 31 ऑगस्टपर्यंत पुरवणी याद्या तयार करणे, विलिनीकरण व एकत्रिकरण करुन पारुप मतदार यादी तयार करतील. 10 सप्टेंबर रोजी पारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येईल. त्यावर 31 ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येतील. 4 जानेवारी रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे.