Published On : Wed, Nov 6th, 2019

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांची भरोसा सेलला भेट

Advertisement

नागपूर: सुभाष नगर येथील भरोसा सेल वbसखी वन स्टॉप सेंटरला आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज भेट दिली.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने पीडित महिलांच्या मदतीसाठी सखी वन स्टॉप सेंटर कार्यरत आहे.

भरोसा सेलच्या वतीने संकटात सापडलेल्या महिला व मुलांकरिता पोलीस, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ञ, समुपदेशक व पुनर्वसन तसेच संरक्षण सेवा देण्यात येत असल्याची माहिती शुभदा संख्ये यांनी यावेळी दिली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी भरोसा सेल व सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्यपध्दतीची माहिती व कामकाज जिल्हाधिका-यांनी जाणून घेतली.

यावेळी श्रीमती संख्ये यांनी भरोसा सेलमध्ये पीडित महिलांना सर्वप्रकारचे सहाय्य एकाच ठिकाणी मिळवून देण्याकरिता सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात येतात. महिला हेल्पलाईन क्रमांक 1091 व 100 या क्रमांकावर तक्रारदारांच्या तक्रारी स्विकारून तज्ञांकडे पाठविण्यात येत असल्याचे सांगितले.

भरोसा सेलमध्ये 20 कर्मचारी व 12 समुपदेशक सेवा देत असल्याची माहिती शुभदा संख्ये यांनी यावेळी दिली. तसेच साधारण 200 ते 250 महिलांना या सेलव्दारे लाभ देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिका-यांनी समुपदेशन कक्षांची पाहणी केली.