Published On : Wed, Nov 6th, 2019

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ मोहिमेच्या कामाला गती द्यावी -जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे

Advertisement

नागपूर: ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ मोहिमेत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. फक्त शासकीय पध्दतीने काम न करता समग्र दृष्टिकोन ठेवून वैयक्तीक लक्ष द्यावे. या मोहिमेच्या प्रगतीबाबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज असमाधान व्यक्त करून या मोहिमेला गांर्भियाने घेण्याची गरज असल्याचे निर्देशीत केले.

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ डिस्ट्रीक्ट टास्क फोर्सच्या सभेत आज ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास जिल्हा परिषदेचे भागवत तांबे यासह संबंधित समितीचे सदस्य उपस्थित होते.

डिस्ट्रीक्ट टास्क फोर्सच्या कामाविषयी संगणकीय सादरीकरण करतांना विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जिल्हाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी मुलींच्या जन्मदरांचे प्रमाणाचे तालुकानिहाय आकडेवारी, मुलींची शाळेतील गळती तसेच तालुकानिहाय असलेली या योजनेची प्रगती याची विस्तृत माहिती घेऊन उद्या शुक्रवार (8 नोव्हें) रोजी पुन्हा बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.