Published On : Fri, Aug 2nd, 2019

रामकृष्ण मठ नागपुर व्दारे गरजवंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

कन्हान : – पंडित जवाहर नेहरू विद्यालय कन्हान येथील गरजवंत विद्यार्थ्या रामकृष्ण मठ नागपुर व्दारे गणवेश वाटप करण्यात आले.

गुरुवार (दि.१) ला रामकृष्ण मठ नागपुर व्दारे पंडित जवाहर नेहरू विद्यालय कन्हान येथील इयत्ता ५ वी व ६ वी च्या गरजवंत विद्यार्थ्यांना रामकृष्ण मठाचे स्वामी ब्रम्हानंद महाराज यांच्या हस्ते श्री मस्के सर यांच्या अध्यक्षेत आणि प्रमुख अतिथी श्री देव, श्री साटोकर, श्री ढोले, श्री शेंडे व संस्थेचे सचिव श्री मनोहरराव कोल्हे आदी च्या उपस्थित गणवेश वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री साबळे सर हयानी तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बोरकर सर हयानी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे
प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.