Published On : Sun, Oct 3rd, 2021

पन्नालाल देवडिया शाळेच्या विद्यार्थ्यांना महापौरांच्या हस्ते टॅबलेट वितरण

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ई-टॅबलेट चे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका सरला नायक, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री कोरमकर, शाळा निरीक्षका खोब्रागडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते टॅब प्रदान करण्यात आले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षण घेण्याचे आवाहन यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांना केले.

प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मोहन करणकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका पोहरे यांनी केले. आभार अशोक शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री वसुले, श्री टेकाम, श्री कावळे, श्रीमती शिरभाते, श्रीमती गौर, श्रीमती नुसरत यांनी विशेष प्रयत्न केले.