Published On : Mon, Jul 29th, 2019

वराडा येथील गरजवंत २६ विद्यार्थ्यांना पाठ्यसामुग्रीचे वितरण

कन्हान : – वराडा येथील यशवंत विद्यालयात आज (दि.२९) विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ व लाईव्ह अर्थ सेवा संरक्षण ट्रस्टच्या वतीने वराडा, एंसबा व केरडी येथील गरजवंत २६ विद्यार्थ्यांना पाठ्यसामुग्रीचे मोफत वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका किर्ती निंबाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव खिमेश बढिये, जिल्हा ग्रामीण संघटक गणेश खोब्रागडे, प्रशांत वैद्य उपस्थित होते. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करुन त्यांना खंबीरपणे उभे राहण्याचे पाठबळ या सामाजिक उपक्रमातून होत असल्याचे गौरवोद्गार मुख्याध्यापिका निंबाळकर यांनी व्यक्त केले.

तर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे सचिव खिमेश बढिये यांनी सांगितले. यावेळी २६ विद्यार्थ्यांना पाठ्यसामुग्रीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मोतीराम रहाटे यांनी तर आभार आर बी गभने यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ए. आर. शिंगणे, एस. पी. कुथे, रूपाली चिखले, अश्विनी खंडार, दिपक पांडे यांनी सहकार्य केले.