Published On : Wed, Mar 3rd, 2021

खैरी येथे ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड वितरण

कामठी :-आज 3 मार्च ला ग्रामपंचायत खैरी येथे सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनी कोविड-19 चे आदेश नियम पाळून गावातील जेष्ठ नागरिकाना कोरोना विषयी माहिती देण्यात आली.

यावेळी माहिती देताना तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे,सोशल डीस्टनशिंग चे पालन करणे तसेच शानाच्या नियमाचे पालन करणे अशी जेष्ठ नागरिकांना माहिती देण्यात आली. त्याच बरोबर पन्नास(50) वर्षीय जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळ चे अर्धी तिकीट स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले तसेच गरीब मजदूर कामगार लोकांना कामगार जॉब कार्ड वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच बंडू कापसे, बिना चे सामाजिक कार्यकर्ते भिवा तांडेकर , दिल्लू शेख , नथुजी भडंग , रमेश ठाकरे , तसेच खैरी ग्रामपंचायत चे उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामपंचायतील सर्व अधिकारी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी