Published On : Mon, Jul 22nd, 2019

डिसिपी पथकाने दिले 11 गोवंश जनावरांना जीवनदान

Advertisement

कामठी : स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोदी पडावं मार्गे एका टाटा योद्धा पिकअप वाहनात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून डीसीपी निलोत्पल यांच्या विशेष पथकाने सापळा रचून गुमथळा मार्गे मोदी पडावं कडे येत असलेल्या पांढऱ्या रंगाची टाटा योद्धा पिकअप वाहन क्र एम एच 40 बी एल 1902 वर धाड घातली असता

या वाहनातील मागच्या डाल्यात 11 गोवंश जनावरे निर्दयतेने बांधून अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच वाहन ताब्यात घेऊन अवैधरित्या कत्तलीसाठी जात असलेले 11 गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज करण्यात आली असून या धाडीतून 11 गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 65 हजार रूपये व जप्त वाहन किमती 5 लक्ष रुपये असा एकुण6 लक्ष 65 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आरोपी वाहनचालक व क्लिनर क्रमशः इम्रान युनूस शेख वय 32 वर्षे रा वारीसपुरा कामठी व मो जलील मो शकील वय 20 वर्षे रा तुमडीपुरा कामठी विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आले.

Advertisement
Advertisement

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल यांच्या नेतृत्वात डीसीपी विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक व्ही एम धोंगडे, माधव शिंदे, मनीष भोसले, दुर्गेश माकडे, मनीष बुरडे, अनंता गारमोडे, भारत गरपडे, नितेश धाबर्डे, हर्षद वासनिक यांनी राबविली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement