नेहा प्राथमिक शाळा कन्हान चा उपक्रम.
कन्हान : – कोरोना (कोविड२९) मुळे संपूर्ण देशभर केंद्र सरकारने लॉक डाऊन घोषित केल्यामुळे सर्वत्र कर्फ्यु सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध आस्थापणासह देशभरातील प्राथ मिक शाळा मधील विद्यार्थ्यांना सोशल डिस्टनसिंग अंतर्गत शाळेत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिक्षक वर्क फ्राम होम अंतर्गत काम करीत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारे हक्काचे भोजन बंद झालेले आहे.
या आणीबाणीच्या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत शिल्ल क असणारे तांदूळ आणि डाळी यांचे वाटप समप्रमाणात करण्यात यावे आणि या कठीण प्रसंगी मुलांची मदत करावी. जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांना आहा रावाचुन उपाशी राहण्याची वेळ येऊ नये असे निर्देश राज्य सरकार आणि जिल्हा परिषद नागपूर यांनी दिले आहेत.शासना च्या आदेशाप्रमाणे नेहा प्राथमिक शाळा कन्हान ता.पारशिवनी जि. नागपूर येथे शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना तांदूळ आणि डाळीचे वाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपसली.
या करिता सर्व विद्यार्थ्यांच्या पालकां ना शाळेत बोलावून सोशल डिस्टनसिंग चा विचार करीत सर्वाना १ मीटर अंतरा वर उभे करीत चेहऱ्यावर मास्क अथवा रुमाल लावण्यास सांगण्यात आले. पाल कांनाही अशीच सुचना करण्यात आली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापि का मंगला पाहुणे, सहायक शिक्षक गणेश खोब्रागडे, वनिता घोडेस्वार, स्वयं पाकी मदतनीस किरण कुंभलकर यांनी परिश्रम पूर्वक यशस्वी नियोजन केले.
याप्रसंगी प्रेम रोडेकर अध्यक्ष शा व्य स, सुरेंद्र शेंडे उपाध्यक्ष शा व्य स, दिपक गायकवाड सदस्य शा व्य स. सकुनबाई शेंडे सदस्या शा व्य स, कैलास खोब्रागडे आणि पालक उपस्थित होते.