Published On : Sat, Apr 4th, 2020

अवैद्य दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड

Advertisement

नागपूर:- गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून एकूण ५,५६,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कार्यवाही गुरुवार दि २ एप्रिल ला बुटी बोरी पोलिसांनी केली. बुटी बोरी पोलीस स्टेशन हद्दीतील उमरेड रोड वरील खापरी सुभेदार शिवारात काही इसम गावठी मोहफुलची हातभट्टीची दारू गळण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी उमरेड रोड,खापरी सुभेदार शिवारात धाड टाकुन अंकित अमरसिंग ठाकूर वय २३,रा गोळीबार चौक,पटवी गल्ली मंदिर,नागपूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन मोठ्या कॅन मध्ये ७० लिटर गावठी मोहफुल दारू,दोन प्लास्टिक कॅन,एम एच ४९ बी जी ३४७५ क्रमांकाची होंडा ऍक्टिवा गाडी असा एकूण ६४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.दुसऱ्या कार्यवाहीत आरोपी सोहन श्याम निमजे वय २० वर्ष रा गोळीबार चौक,पटवी गल्ली मंदिर,नागपूर यांच्यावर करण्यात आली.

आरोपी कडून एका प्लास्टिक डबकी मध्ये १५ लिटर गावठी मोहफुल दारू व डबकी असा एकूण ३२०० रुपयांचा माल जप्त केला. तिसरी कार्यवाही रिशिकेश मनोहर देवघरे वय २२ रा प्लॉट न ४४८,उदय नगर,यामाहा शोरूम जवळ, नागपूर,याचे कडून सुद्धा १५ लिटर गावठी मोहफुल दारू व डबकी असा एकूण ३२०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. चौथी कार्यवाही शंकर होमदेव बारापात्रे,वय ३० रा टिमकी , तीन खंबा पोलीस चौकी मागे,गोळीबार चौक,नागपूर दोन मोठ्या कॅन मध्ये ७० लिटर गावठी मोहफुल दारू,दोन प्लास्टिक कॅन,एम एच ४९ बी इ ८३८५ क्रमांकाची होंडा गाझिया मोपेड असा एकूण ७४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पाचवी कार्यवाही आरोपी शेख फारूक शेख तय्यब वय ४०,रा मोठा ताजबाग,यासिन प्लॉट,नागपूर यांचेकडून चार मोठ्या कॅन मध्ये १४० लिटर गावठी मोहफुल दारू ,चार प्लास्टिक कॅन,एम एच ४९ इ ५८८८ काळ्या रंगाची जुनी प्रवाशी रिक्षा असा एकूण १,७८,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहावी कार्यवाही आरोपी मनोज भगवान उके,वय ४० रा पेवठा,रुई (पांजारी),नागपूर यांचे वर करण्यात आली.यांचेकडून दोन मोठ्या कॅन मध्ये ७० लिटर गावठी मोहफुल दारू,दोन प्लास्टिक कॅन,इक एम एच ४९ ए एच २९०७ क्रमांकाची होंडा ऍक्टिवा असा एकूण ७४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सातवी कार्यवाही राकेश ईश्वर कोहळे वय २४,रा बनवाडी, जामठा रोड,त जी नागपूर यांचेवर करण्यात आली असून आरोपी कडून एका प्लास्टिक डबकी मध्ये १५ लिटर गावठी मोहफुल दारू व १ प्लास्टिक डबकी असा एकूण ३२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आठवी कार्यवाही आरोपी कैलास मनोहर शेंडे वय ३१ रा टेलिफोन नगर,नरसाळा,दिघोरी रोड,नागपूर यांचेकडून एका प्लास्टिक डबकी सह १५ लिटर गावठी मोहफुल दारू असा एकूण ३२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर नवव्या कार्यवाहीत आरोपी विक्रम भरत पारधी,वय ३५ रा दिघोरी नाका,सावळी अम्मा दर्गा रोड,नागपूर यांचेकडून दोन मोठ्या कॅन मध्ये ७० लिटर गावठी मोहफुल दारुसह,दोन प्लास्टिक कॅन जुनी वापरति होंडा स्प्लेनडर क्र एम एच ४० जी ३६४० सह असा एकूण ७४४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर दहाव्या कार्यवाहीत आरोपी शेख कयूम शेख अयुब वय ३२ रा म्हाळगी नगर,नागपूर यांचेकडून ७० लिटर गावठी मोहफुल दारुसह दोन प्लास्टिक कॅन तसेच ग्रे रंगाची एम एच ४९ एस ४४५९ क्रमांकाची हिरो आय स्मार्ट गाडी असा एकूण ७४४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तर अकराव्या व शेवटच्या कार्यवाहीत आरोपी ऋषी राजू माळी वय ३५,रा वडद, नागपूर यांचेकडून १५ लिटर गावठी मोहफुल दारूसह १ प्लास्टिक कॅन असा एकूण ३२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अशा एकूण अकराही कार्यवाहीत ५ मोटार सायकल,१ प्रवासी रिक्षा,गावठी मोहफुल दारू असा एकूण ५,५६,४०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह ११ आरोपींना अटक करून सर्व आरोपींनवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ अ ई अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली.

पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत,उपविभागीय पोलीस अधिकारी,नागपूर विभाग चव्हाण यांचे मार्गदर्शनात बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख,पो उ नि अमोल लगड,पो ह मिलिंद नांदूरकर,पो ना सत्येंद्र रंगारी,कापसे,पो शी अमृत कीनगे,राकेश तालेवार,चौधरी,गेडाम व चालक वैद्य यांनी केली असून पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहे.