धर्मवीर संभाजी बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम
बुटीबोरी:-बुटीबोरी नजीकच्या सातगाव येथील जि. प.शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना धर्मवीर संभाजी बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक योगेश सातपुते यांच्या पुढाकरात शालेय साहित्याचे आज वाटप करण्यात आले
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठयपुस्तके तसेच गणवेश दिला जातो.परंतु त्याव्यतिरिक्त लागणारे आवश्यक साहित्य पालकांना स्वखर्चाने खरेदी करावे लागतात.आधीच महागाईने कंबरडे मोडले असतांना बऱ्याच पालकांना ते सहज शक्य होत नाही.शिवाय या हंगामात शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी पालकांना देखील आर्थिक अडचण असते.त्यांच्या ह्या परिस्थितीला हातभार म्हणून परिसरातील शेतकरी,मजुरवर्ग तसेच आदिवासी कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा स्थानिक धर्मवीर संभाजी बहुद्देशीय संस्थेने उपक्रम हाती घेतला असून सातगाव येथील जि. प.शाळेतील २६५ गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नोंद वह्या अश्या एकूण १६०० प्रती तसेच इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.परिसरातील इतरही ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी योगेश सातपुते यांनी सांगितले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दलाल,शिक्षिका सौ मुळे सचिव चेतन दांडेकर,शैलेश नागपुरे,पुरुषोत्तम उपरे,मंगेश झोडे, तिलक नागपुरे, सुधाकर धामंदे,अनुप आवारी,नंदू वाघमारे,शरद नागपुरे, निखिल मोहितकर,अनिकेत मोहितकर,विशाल मोहितकर,सूरज तुमडाम,अक्षय रायपुरे, मनीष मानकर,अनुप सेलकर,आकाश बोरधरे, मंगेश कुंभारे,कृनाल मांढरे,प्रेम विरुटकर, रजत महाकुलकर आदी उस्थितीत होते.प्रसंगी पालक आणि विद्यार्थानी संस्थेचे आभार मानले.
– संदीप बलवीर,बुटीबोरी