Published On : Thu, Apr 2nd, 2020

थकलेल्या लोकांना मदत म्हणून ग्रामपचायत कांद्री खदान मार्फत आलुभाताचे वाटप

खवासा बॉर्डर पर्यंत सोडण्यासाठी बस तसेच ट्रक ची केली व्यवस्था.

रामटेक: कोरोना व्हायरस च्या वाढत्या संसर्गामुळे भारतात एकाएकी लॉक डाऊन घोषित करण्यात आले. संपूर्ण देशात धारा 144 लागू करण्यात आली. जमावबंदी व संचारबंदी अन्वये कोणीही व्यक्ती रस्त्यावर दिसणार नाही म्हणून जागोजागी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला.

सर्व वाहनांना रस्त्यावरून धावणे बंद करण्यात आले. परंतु अशातच मजूर वर्ग मोठ्या संख्येने आपापल्या घरी पैदल वाट्टेल त्या रस्त्याने घराच्या दिशेने परतायला लागले. नागपूर हून मध्यप्रदेश कडे मजुरांचे लोंढे चे लोंढे डोक्यावर ओझे घेऊन जात होते. त्यात लहान मुले, म्हातारी माणसे, गरोदर स्त्रिया तहानलेल्या व उपास पोटी अवस्थेत चालत होती. अंदाजे 400 – 500 की.मी.अंतर चालल्यामुळे संपूर्ण पणे थकलेली होती.

त्यामुळे थकलेल्या लोकांना मदत म्हणून ग्रामपचायत कांद्री खदान मार्फत दररोज आलुभाताचे वाटप करण्यात येत आहे .त्यांना खवासा बॉर्डर पर्यंत सोडण्यासाठी बस तसेच ट्रक ची व्यवस्था करण्यात आली. पाण्याच्या बॉटल सुध्दा वितरीत करण्यात आल्या.

यावेळी ग्रा. पं. सरपंच परमानंद शेंडे, उपसरपंच मंजित बहेलिया, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश खोब्रागडे, नितेश देहरिया, सत्येंद्र देहरीया, मदन वरकडे, विजय भारद्वाज, विनोद पाटील, हरीश सारवे, सुधीर गोंदुले, राजेश धार्गावे, संतोष धुरिया, सुजित साई यांनी मोलाचे सहकार्य केले. कान्द्री माईन मॅनेजर खान व मनसर माईन मॅनेजर देकाटे यांनी सुध्दा आपले योगदान दिले.