Published On : Mon, Aug 26th, 2019

प्रधानमंत्री मानधन योजना लाभार्थ्यांना पालकमंत्री बावनकुळे च्या हस्ते पेन्शन कार्ड वितरण

Advertisement

कामठी :-शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी केलेल्या लाभार्थी शेतकरी विलास भोयर रा आजनी तालुका कामठी यासह इतर शेतकऱ्याना पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते पेन्शन कार्ड चे वितरण करण्यात आले.

हे पेन्शन कार्ड वितरण आज कामठी तहसील कार्यालय सभागृहात आयोजित पेंशन कार्ड वितरण कार्यक्रमांतर्गत करण्यात आले.याप्रसंगी तहसीलदार अरविंद हिंगे,तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत, नंदकिशोर रामटेके आदी उपस्थित होते.

याप्रसंगी 18 ते 40 वर्षे वयोगटातील 2 हॅकटर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सीमांत शेतकरी (एसएमएफ)या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत .पात्र लाभार्थ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे .लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्याची सुद्धा तरतुद या योजनेत आहे .या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी 23 ऑगस्ट पासून तालुक्यातील ग्रामपंचायतीत शिबिरे राबविणे सुरू करण्यात आले आहेत. तसेच 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 40 वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह 55 ते 200 रुपये रक्कम जमा करावी लागेल सदर रक्कम 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

यात केंद्र शासनाकडून सुद्धा लाभार्थ्यद्वारे जमा केलेली रक्कम जमा करण्यात येईल.गाव पातळीवर सुविधा केंद्र(कॉमन सर्व्हिस सेंटर)लाभार्थी नोंदणी करण्यात येत आहे .नोंदणीनंत र लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हास्याची रक्कम ऑटो डेबिटने विमा कंपनी कडे जमा होईल अशी माहिती पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

संदीप कांबळे कामठी