Published On : Tue, May 26th, 2020

राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टद्वारे पोलिसांना आवश्यक किटचे वाटप

नागपूर : राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टद्वारे पोलिसांना आवश्यक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार यांनी कोतवाली पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यांना या किटचे वाटप केले.

श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते सॅनिटाझर, मास्क, फेस शील्ड, हॅण्ड ग्लोव्ह ची किट कोतवाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डी.बी. भोसले यांच्या स्वाधिन करण्यात आली. यावेळी राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे घेण्यात येणारे विविध उपक्रम व कार्यक्रमांची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार यांनी डी.बी.भोसले यांना सांगितली.

यावेळी ट्रस्टचे सचिव निरंजन रिसालदार, श्रीकांत आगलावे, अनिल देव, आबा खांडवे, सौरभ महाकाळकर आदि उपस्थित होते. ट्रस्टमार्फत १०० किटचे वाटप विविध पोलिस स्थानकांमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती सचिव निरंजन रिसालदार यांनी दिली.