Published On : Wed, Jul 31st, 2019

प्रभाग क्र 15 च्या 55 रहिवाश्यांना पट्टे वाटप

Advertisement

कामठी:-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 15 येथील आनंदनगर, रामगढ रहिवासी सन 2011 च्या पुर्वी पासून झोपडयात आपले जीवनायपण करीत आहेत मात्र या परिसराला रहिवासी क्षेत्र घोषित न केल्याने येथील नागरिक स्थायी पट्ट्यापासून आजपावेतो वंचित होते मात्र नगर परिषद निवडणुकीदरम्यान नगरसेविका संध्या उज्वल रायबोले यांच्या निवडणूक प्रचारार्थ पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी या परिसराला रहिवासी क्षेत्र घोषित करून येथील अतिक्रमन नियमानुकूल नियमित करून रहिवाश्यना मालकी हक्क मिळवून देणार अशी घोषणा केली होती या आश्वासनाची खरोखर आश्वासनपूर्ती करीत दिलेला शब्द पाळला व येथील रहिवश्यना पट्टे मंजूर करण्यात आले असून सोमवारी तहसील कार्यालय कामठी येथे प्रभाग क्र 15 च्या 55 रहिवश्यना पट्टे वाटप करण्यात आले.

हे पट्टे वितरण पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी राज्यमंत्री एड सुलेखाताई कुंभारे, माजी जी प सदस्य अनिल निधान,उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते,तहसीलदार अरविंद हिंगे, नगराध्यक्ष मो शाहजहा शफाआत, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगरसेविका संध्या रायबोले, नगरसेवक नीरज लोणारे,नगरसेवक प्रतीक पडोळे, नगरसेवक लालसिंग यादव, छोटू मानवटकर , नगरसेविका सावला सिंगाडे, उज्वल रायबोले,मनीष वाजपेयी, अज्जू अग्रवाल, भाजप शहराध्यक्ष विवेक मंगतानी,लाला खन्देलवाल, सतीश जैस्वाल ,आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यानंतर कामठी बस स्टँड जवळ हायमास्ट लाईट चे लोकार्पण , स्व.सरजूप्रसाद दुबे सामाजिक संस्था कार्यालय उदघाटन, कामठी रेल्वे स्टेशन परिसरात सार्वजनिक शौचालय बांधकाम भूमिपूजन, तसेच दिवाण मंदिर कामठी सभागृह बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडले.

संदीप कांबळे कामठी