कामठी :-शेतीसोबतच शेतकऱ्यांनी पूरक जोडधंद्याकडे वळावे यासाठी शासन विविध योजना राबवित आहे यानुसार कामठी पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना अंतर्गत योजनेत दुधाळ संकरित गाय/ म्हशीचे गट वाटप करणे, शेळी /मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे ही योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती या प्रवर्गातील 18 वर्षावरील अर्जदारकडून 25 जुलै 2019 पासून 8 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून शेवटची मुदत ही 8 ऑगस्ट 2019 आहे तेव्हा इच्छुक लाभार्थ्यांनी 8ऑगस्टपर्यंत https://ah.mahabms.comया संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असे आव्हान कामठी पंचायत समिती चे पशुधन विकास अधिकारी डॉ लीना पाटील यांनी केले आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना अंतर्गत सुरू असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनि तसेच इच्छुक लाभार्थ्यांनी अर्जाचा नमुना पशुसंवर्धन विभागाच्या उपरोक्त नमूद संकेतस्थळावरून मिळवून ऑनलाइन पद्धतीने अर्जाची नोंद करावी , अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत तसेच अर्ज भरताना अर्जदाराचा फोटो 80 के बी व स्वाक्षरी 40 के बी मध्ये असने आवश्यक आहे तसेच अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावरच एसएमएस द्वारे संदेश पाठविण्यात येणार असल्याने अर्जदाराने लाभार्थी निवड अंतिम होईपर्यंत कुठल्याही परीस्थितीत भ्रमणध्वनी क्रमांक बदलवू नये हे इथं विशेष!
अर्जदाराची प्राथमिक निवड अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहिती नुसार संगणकाद्वारे करण्यात येणार असली तरी निवड ही त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच करण्यात येणार आहे.
संदीप कांबळे कामठी
