Published On : Wed, Mar 31st, 2021

कढोलीच्या ‘त्या’स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट मक्याचे वाटप

Advertisement

साहेब , आम्हाला मका नको गहूच द्या लाभार्थ्यांची आर्त हाक

कामठी:-सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या राशन मध्ये लाभार्थ्यांना मिळणाऱ्या गहू धाण्यातून काही किलोची कपात करून रास्त धान्य ग्राहकांना मका दिला जात आहे.गव्हाच्या ठिकाणी मका दिला जात असल्याने गोरगरिबांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाले असून गोरगरिबांना नाईलाजाने मका विकत घ्यावा लागत आहे त्यातही स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणारा मका हा निकृष्ट दर्जाचा असल्याने आता या मक्याचे करायचे काय?असा प्रश्न नागरिकापूढे उपस्थित झाला असून या प्रकारचा निकृष्ट दर्जाचा मक्का कामठी तालुक्यातील कढोली गावातील कमलाबाई काकडे नामक लाभार्थीला गुलाबराव खंते नामक स्वस्त धान्य दुकांनदाराने दीला असल्याने आजच्या या महागाईच्या काळात गोगरिबांची सर्रास थट्टा करणारा प्रकार आहे.

मागील महिन्यापासून रास्त धान्य दुकानामार्फत शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिका नुसार गोरगरिबांना वाटप केल्या जाणाऱ्या गहू या मालाची 50 टक्के कपात करण्यात आली.यानुसार गोरगरिबांना अंत्योदय करिता सुरुवातीला 15 किलो गहू मिळायचे त्या ठिकाणी आता 10 किलो मका व 5 किलो गहू मिळत आहे तर प्राधान्याना याच प्रकारेआदी अन्न धान्य दिले जात होते,.आणि त्याच माध्यमातून अनेक गरिबांच्या चुली पेटत होत्या परंतु मागील महिन्यापासून आता एक व्यक्तीस गहू मिळण्याऐवजी त्या बदल्यात अर्धे गहू तर अर्धा मका देण्यात येत आहे त्यामुळे या मक्याचे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण आपल्याकडे मकाच्या भाकरी बनविणाऱ्यांची संख्या एकदमच कमी आहे त्यामुळे लाभार्थ्यांना जबरदस्तीने दिलेला मका यावेळी अक्षरशा टाकून दिला त्यातही मिळणारा निकृष्ठ मका हा गोरगरीब लाभार्थ्यांची थट्टा उडविण्याचा प्रकार आहे.

एकीकडे सर्वसामान्य जनता कोरोना आपत्तीमुळे मेटाकुटीस आले आहे. वर्षभरापूर्वी सर्वत्र कोरोनाचा शिरकाव होताच सरकारने लागू केलेल्या लॉकडॉउन चा फटका कामठी तालुक्यातील नागरिकांना ही पडला या कालावधीत कित्येकांचा रोजगार हिरावला गेला, अनेकांचे उद्योगधंदे बंद झाले, गरीब जनतेने यातून कसेबसे सावरण्याचा प्रयत्न करीत असताना अचानकपणे आलेली कोरोनाची दुसरी लाट त्यातच वाढलेली महागाई गरिबांचे कंबरडे मोडणारी आहे त्यातच स्वस्त धान्य दुकाणातून शिधापत्रिका धारकांना देण्यात येणारा निकृष्ट दर्जाचा मक्का हा गरिबांची थट्टा उडविणारा प्रकार आहे.

संदीप कांबळे कामठी