| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, May 1st, 2020

  डाँ.शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास समिती पिपरियाचे माध्यमातून पिपरीया ग्रामस्थांना किराणा समान वाटप

  रामटेक: कोरोना चे संकट अख्ख्या जगावर कोसळले आहे. लॉक डाऊन व संचार बंदी मुळे रोज मजुरी करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरणार याचा प्रत्येकाला विचार आला आहे.

  ग्रामिण भागातिल उदरनिर्वाहाच्या अडचणी वाढल्या आहेत,रोजगार ठप्प झाले असल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे ,

  तेव्हा पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदु पाठक व सहा वनसंरक्षक. अतुल देवकर यांनी व्याघ्र प्रकल्पातिल मार्गदर्शक( गाईड) यांना किराणा सामानाचे वाटप केले,तसेच डाँ.शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास समिती पिपरियाचे माध्यमातुन पिपरिया संपुर्ण ग्रामवासीयांना प्रत्येक कुटुंबाला किराणा सामान अनाजाचे वाटप करण्यात आले,समितीचे अध्यक्ष सुर्यभान हजारे, भिमराव वाळके,कोषाध्यक्षा कल्पना चिंचोळकर, निलेश हिरकने, गजानन खोब्रागडे, अनिता वाहाने , रेखा ठाकरे, यांनी संपुर्ण गावातील गरजुंची माहिती घेऊन, समस्त गावात किराणा सामानाचे वाटप करण्यात आले,या प्रसंगी वनपरिक्षेञ अधिकारी मंगेश ताटे व सहायक वनक्षेञ अधिकारी तथा समितिचे सचिव संजय परेकर यांनी किराणा सामान वाटप केले.
  समस्त पिपरिया गावातील गावकर्यांनी वन्यजीव वनविभागाच्या एक प्रशंसनीय स्तुत्य उपक्रम बद्दल खूप खूप आभार मानले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145