Published On : Fri, May 1st, 2020

कामठी तालुका प्रशासन व बुलढाणा प्रशासनाच्या समन्वयाने कामठीत पसरणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा अनर्थ टळला

Advertisement

-कामठी चे तीन कोरोनाबाधित रुग्ण बुलढाण्यातील शासकीय अलगिकरन कक्षात दाखल

कामठी :- संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू केले असून नुकतेच कामठी शहरातील एक कोरोनाधित रुग्ण शासकीय अलगिकरण कक्षातून वैद्यकीय उपचार घेऊन बरा होऊन येत नाही तोच कामठी चे 11 तब्लिगी बुलढाण्यात लॉकडाउन मध्ये अडकले असून

यातील तीन तबलिगी कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे निषपन्न झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .विशेष म्हणजे या 11 ही तबलिगीनि बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कडे कामठी ला जाण्याची परवानगी मागितली होती मात्र त्यांना हॉस्पिटल कोरोन्तटाईन करून त्यांच्या स्वबचे नमुने तपासणीचे सांगितल्या वरून 27 एप्रिल ला आलेल्या तपासणी अहवालात या 11 पैकी तिघांचे अहवाल पोजिटिव्ह आले तेव्हा या सिक्रेट कोरोनाग्रस्तना तेथील पोलीस विभागाने परवानगी दिली असती तर हे कोरोनाग्रस्त कामठी त येउन सामान्यात वावरले असते व यामुळे कोरोनाचा फैलाव कामठी शहरात मोठ्या प्रमाणात होऊन कदाचित कोरोनाचा उद्रेकच झाला असता मात्र वेळीच कामठी तालुका प्रशासन तसेच बुलढाणा शहर प्रशासनाच्या समन्वयातुन घेतलेल्या सतर्कतेमुळे कामठीत अनावधानाने पसरणारा कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्यास बाधा ठरला व अनर्थ टळला.

मात्र कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर कामठी येथील एकूण 11 तबलिगी बुलढाणा शहरातील हुसैनिया मस्जिद येथे शासनाची कुठलेही परवानगी न घेता लपून राहल्याने त्यांनी कोरोना आजाराची लागण झाल्याची माहिती लपविली व इतर लोकांना लागण करून जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी कामठी च्या या अकराही तबलिगी विरोधात कलम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 52,54 साथरोग प्रतिबंध कायदा कलम 3, भादवी कलम 269, 270, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या कामठी च्या या 11 आरोपी मध्ये शेख रोशन अकबर हुसेन, शेख फरीद अब्दुल रहमान, मोहम्मद खुर्शीद मोहम्मद अलीमोद्दीन, मंजूर अहमद मोहम्मद आफाक, शाफिक अहमद मोहम्मद युनूस, इरफान अहमद मोहम्मद शकील , शकील अहमद मोहम्मद इब्राहिम, शेख इब्राहिम शेख हब्बू, मोहम्मद खुर्शीद शेख बफाती, अब्दुल सलीम अब्दुल रहमान, मोहम्मद इब्राहिम मो खुर्शीद चा समावेश आहे.

बॉक्स:- तबलिगी जमातच्या धार्मिक उपक्रमासाठी कामठी येथून 11 जण 29 फेब्रुवारीला महाराष्ट्र एक्सप्रेस ने शेगाव ला दाखल झाले होते 4 मार्च पर्यत खामगाव तर 20 मार्च पर्यंत चिखली येथे थांबले त्यानंतर बुलढाणा शहरात आले पण 22मार्च लॉकडॉऊन लागू झाल्याने मिर्जा नगर परिसरातील उलूम हुसैनिया मदरश्यात अडकले .

या 11 ही तबलिगी जमातींनी कामठी ला परत येण्यासाठी बुलढाणा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप भुजबळ यांच्याकडे अर्ज सादर केले होते यावर भुजबळ यांनी तहसीलदार संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या तबलिगी सोबत राहणारा एक व्यक्ती कोरोना बाधित होऊन मृत्यू झाल्याची घटना 29 मार्च ला घडल्याने या तब्लिगीना कोरोना संसर्गाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यावरून या तब्लिगीना कामठी न पाठवता हॉस्पिटल कोरोणटाईन करून त्यांच्या स्वैब चे नमुने रीतसर पाठवण्याचे सांगितल्या वरून बुलढाणा पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी जिल्हा शल्य चिकित्सक ला दिलेल्या आदेशावरून झालेल्या तपासणीत या 11 पैकी तीन तबलिगी कोरोना पोजिटिव्ह आढळले.

बॉक्स:-बुलढाणा पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी या 11 तबलिगी ना कामठी त जाण्यास मज्जाव केला नसता तर हे सर्व 11 जण कामठी त येऊन जिकडे तिकडे सामन्यात वावरले असते व कोरोनाचा फैलाव नकळत या व्यक्ती कडून मोठ्या प्रमाणात झाला असता व शहरातील लोक गाफील राहले असते मात्र कामठी तालुका प्रशासन तसेच शहर प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कामठी त पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्गाचा अनर्थ टळला.

तर कामठी शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव न होवो यासाठी नागपूर शहर पोलिस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त निलोत्पल , कामठी तहसिलदार अरविंद हिंगे , एसीपी राजरतन बन्सोड, पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, पोलीस निरीक्षक पाल , पोलीस निरीक्षक परदेसी तसेच नगर परिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके, बीडीओ सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी, डॉ धीरज चोखांद्रे व समस्त पथक हे अविरत प्रयत्न करोत आहेत परिणामी आज कामठी शहरात कोरोना बाधितांची संख्या शून्य आहे.हे कामठी तालुका प्रशासनाचे कौतुक होत आहे.