Published On : Mon, Apr 6th, 2020

आमदार.आशिष जयस्वाल कडून अत्यावश्यक सामग्री वाटप

Advertisement

रामटेक: रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड.आशिष जयस्वाल यांच्याकडून ज्या कुटंबाटडे राशन कार्ड नाहीत अशा वंचित घटक गरजू लोकांना *मनसर* येथे जीवनावश्यक किराणा साहित्य वाटप करण्यात आले.

देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे त्यापासून बचाव हाच उपाय आहे. त्यामुळे संपूर्ण देशात २१ दिवसाचे लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे.तसेच राज्यात जिल्हा सीमाबंदी सुद्धा लागू अशावेळी सर्वत्र बांधकाम व अन्य रोजगार कामे बंद आहेत.

मात्र २१ दिवस कौटुंबिक उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी मदतीचा हात पुढे करत ज्या कुटुंबाकडे राशन कार्ड नाही अशा एक हजार कुटुंबाला अत्यंत जिवनावश्यक वस्तूचे वाटप मनसर येथे करण्यात आले आहे.

आणि आणखी एक हजार कुटुंबाला वाटप करण्याचा त्यांचा संकल्प आहे. अत्यावश्यक वस्तू वाटप करतेवेळी रामटेक पचायत समितीचे माजी सभापती अरूण बंसोड,ग्रामपंचायत मनसरचे उपसरपंच चंद्रपाल नगरे, ग्राम पंचायत मनसरच्या माजी उपसरपंच कलावती तिवारी, मां वैष्णवी ग्रुप मनसर चे संचालक सोनूभाऊ तिवारी, माजी ग्राम पंचायत सदस्य मनसर चे प्रा. हेमराज चोखांद्रे,सामाजिक कार्यकर्ते कमलेश शरनागत , सुनिल सार्वे व समस्त शिवसैनिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.शासनाकडे वारंवार वाढीव मदत मागणे सुरू असून अजूनही मदत अप्राप्त असून मदत मागणी सुरू आहे असे ते यावेळी बोलले.