Published On : Tue, May 18th, 2021

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप

नागपूर : गरीब व गरजू कुटुंबांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय मेहरे यांच्या नेतृत्वात जिवनावश्यक किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

सामाजिक भावनेतून जिल्हयातील सर्व न्यायाधीशांच्या पूढाकाराने 50 गरजू कुटुंबांना दोन महीने पुरेल इतके किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.वितरणासाठी सचिव अभिजीत देशमुख ,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण,संरक्षण अधिकारी साधना हटवार,विनोद शेंडे यांनी परिश्रम घेतले.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे देण्यात येणाऱ्या विधी सेवांची माहितीपत्रक वाटण्यात आली.