Published On : Tue, May 18th, 2021

आमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आमदार निवास विंग -३, सिव्हील लाईन्स येथे महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार कोव्हिड चाचणी केन्द्र मंगळवारी (१८ मे) सुरु करण्यात आले.

आमदार निवास येथे सध्या कोव्हिड रुग्णालय सुरु असून त्यामध्ये १०८ रुग्ण उपचार घेत आहेत. चाचणी केन्द्र सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सुरु राहील. या चाचणी केन्द्राला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. शुभम मनघटे आणि डॉ. पंकज लोधी यांनी भेट देवून व्यवस्थेची पाहणी केली. ‍